जुना बाजार लवकरच ‘रस्त्याआड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

गेली अनेक वर्षे गोरगरीबांसाठी मंगळवार पेठेतील रस्त्यावर भरणारा जुना बाजार आता ‘रस्त्याआड ‘ होणार आहे. वाढत्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यापुढे हा बाजार रस्त्यावरून आतील बाजूस हलविण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून कसबा पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर रविवारी आणि बुधवारी गेली अनेक वर्षे जुन्या वस्तू विक्रीचा बाजार भरतो.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69ffb767-c85d-11e8-9cec-e3f9dda938a4′]

सर्वसामान्य आणि विशेशतः गरिबांना परवडतील अशा माफक दरामध्ये अगदी बूट, चप्पल, कपड्यांपासून खेळणी, व्यायामाचे साहित्य अशा सर्वच वस्तू तेथे मिळतात. यासाठी पूर्वी सिंगल असलेला हा रस्ता बाजाराच्या दिवशी बंद ठेवण्यात येत असे. कालांतराने या रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजकाच्या सहाय्याने रस्त्या दुहेरी करण्यात आला. तरीही दोन्ही बाजूकडील रस्त्यावर बाजार भरत असे.

शरद पवार यावेळी स्वतः लोकसभेच्या निवडणूक रिंगणात ?

परंतू साधारण दहा वर्षांपूर्वी रहदारी वाढल्यानंतर एका बाजूच्या रस्त्यावर बाजार तर दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र गेल्या दहा वर्षांत वाहनांची संख्या दुपटीहून अधिक झाल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर ताण वाढला तसा पुणे मुंबई रस्ता जोडणारा लोकशाहीर अमर शेख चौकही कोंडीत अडकला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि महापालिकेने जुना बाजार रस्ता ही वाहतुकीसाठी कायम स्वरूपी मोकळा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

[amazon_link asins=’B07DX15KH4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74172e35-c85d-11e8-a1c0-67639a7464f4′]

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले की, शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका संयुक्त उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून जुना बाजार रस्ता कायम स्वरूपी वाहतुकीसाठी मोकळा राहावा याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात स्थानिक व्यवसायिकांसोबत बोलणी सुरू आहेत. त्यांचे पुनर्वसन आतील बाजूस करण्यात येईल. वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त पाहणीही करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणीही करण्यात येईल.