‘ATM’ मधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढताना लागणार ‘OTP’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या बँका सुरक्षेच्या कारणास्तव अनेक नवनवीन बदल करत आहेत. ग्राहकांना हॅकर्स पासून वाचवण्यासाठी आणि खात्यातील पैसे सुरक्षित राहण्यासाठी बँका नवनवीन गोष्टींचा वापर करत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. म्हणजे आता पैसे काढताना पिन सोबत ओटीपी सुद्धा द्यावा लागणार आहे.

आरबीआयने स्पष्ट सांगितले आहे की, एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. एटीएम फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात. त्यामुळे आता कॅनरा बँकेप्रमाणे इतर बँका देखील ही ओटीपी प्रणाली सुरु करू शकतात.

एटीएम कार्डच्या क्लोनिंगचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर समोर आले होते. २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएम फसवणुकीचे ९८० प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले होते. याच अनुषंगाने पैसे काढताना ओटीपी प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –