स्वत:ची लायकी समजल्यावर पाकची आता मवाळ भूमिका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर यांनी पाकिस्तानी मीडियायासमोर नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी संगितले आहे. आज सकाळी पाकिस्तान कडून जो एअर स्ट्राईक करण्यात आला. तो युद्धाच्या हेतूने केला गेला नव्हता. काल भारताने केल्या हवाई हल्ल्याच्या बदल्यात आम्ही फक्त आमची क्षमता दाखवण्यासाठी हा स्ट्राईक केला. पाकिस्तानकडून एकूण ६ टार्गेट सेट केले गेले. या हवाई हल्ल्याने कोणाचेही जीवित किंवा लष्करी नुकसान झाले नाही. हे टार्गेट मोकळ्या जागेत करण्यात आले होते. पाकिस्तानने सगळे नियम पाळले. पाकिस्तानला अमन पाहिजे असे म्हणत गफूर याने आपण किती योग्य आहोत असे सांगण्याचा कांगावा केला.

भारतीय वैमानिक ताब्यात – यावेळी बोलताना गफूरने संगितले की, सकाळी दोन भारतीय विमानं आमच्या हद्दीत आली त्यापैकी एक विमान पाकव्याप्त काश्मीर मध्ये पडले. यातील २ वैमानिकांना अटक करण्यात आली आहे. ते जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ते सुरक्षित आहेत त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यांच्याजवळून काही हत्यारे आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याची छायाचित्रे परिषदेत दाखवण्यात आली.


पाकिस्तान कि तराफ से अमन का पैगाम – यावेळी बोलताना पाकिस्तान थोडे नरमल्याचे दिसून आले. युद्ध सुरु करणे सोपे आहे निभावणे अवघड आहे. ‘पाकिस्तान की तरफ से अमन का पैगाम ‘ असे म्हणत आम्हाला युद्ध नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्या अनेक काळापासून भारत – पाक यांच्यात तणाव आहे. दोन्ही देशात संवाद पाहिजे. यावर दोन्ही देशाकडून शांततेत विचार होऊ शकतो. आम्ही जो हवाई हल्ला केला तो केवळ सेल्फ डिफेन्स म्हणून केला असे गफूर यांनी सांगितले. पण जर भारताकडून कारवाई करण्यात आली तर आम्ही देखील तयार आहोत हे सांगायला गफूर विसरले नाहीत .