आता पासपोर्ट व्हेरिफिकेशन होणार फक्त ११ दिवसांत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून  दोन ते तीन दिवसांत प्रक्रिया होत होती. मात्र, पोलीस व्हेरिफिकेशला लागणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागत होता. हा कालावधी कमी करुन ३६ दिवसांवर आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र नियमानुसार २१ दिवसात पोलीस व्हेरिफिकेशन होत नव्हते. पुणे पोलीस आयुक्तपदी डॉ. के व्यंकटेशम यांनी पदभार स्विकारताच पोलीस व्हेरिफिकशनसाठी लागणारा कालावधी कमी करण्यास प्राधान्य दिले. आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून आता पोलीस व्हेरिफिकेशन फक्त ११ दिवसात होणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a24cda16-c7df-11e8-91ef-6fa39237983b’][amazon_link
पुणे शहरामध्ये पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १ जानेवारी २०१८ ते १ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ९ लाख ३८ हजार ६७८ जणांनी पासपोर्ट कार्यालयाकडे पोसपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. पासपोर्ट कार्यालयाकडून व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे आल्यावर नियमाप्रमाणे २१ दिवसांत पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. मात्र, व्हेरिफिकेशनसाठी जुलैपर्यंत ३६ दिवस लागत होते.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी पुढाकार घेऊन पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पडताळणीचा कालावधी कमी करण्याच्या सुचना केल्या. पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन कामाची शमता वाढवण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कामामुळे दीड महिन्यात फरक जाणवला. सध्या पोलीस व्हेरिफिकेशनला ११ दिवसांचा कालावधी लागत असून तो १० दिवसांवर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
[amazon_link asins=’B0756W2GWM,B077N7DDL1,B01N54ZM9W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa46de0a-c7e0-11e8-aa92-d5b0d3f37edb’]
पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी सर्वांत जास्त वेळ पोलीस ठाण्याकडून मिळणाऱ्या टपालासाठी जातो. तसेच अर्जदार घरी उपलब्ध नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यास अनेकदा त्याच्याशी संपर्क साधवा लागतो. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करुन त्यांना अर्जदाराच्या उपलब्ध वेळेप्रमाणे टाईम मॅनेजमेंट करण्यास सांगण्यात आले होते. याचाही उपयोग मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुढील काही दिवसांत टपाल सेवा बंद करुन, कागदपत्रांचे पोलीस ठाण्यातच स्कॅनिंग करुन अधिकाऱ्यांच्या सहीसह कागदपत्रे इ-मेलव्दारे पाठविण्याचे प्रयोजन करण्यात येणार आहे.