मोदी सरकारकडून इन्कम टॅक्सच्या बाबतीत मोठ्या घोषणेची शक्यता, ‘असा’ आहे प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकार कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीनंतर आता सर्वसामान्यांसंबंधित आयकरबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आयकर सूट देण्याचा विचार मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देवरॉय यांना या संबंधित दुजोरा दिला आहे. कॉर्पोरेट करात कपातीनंतर आता सरकार लवकरच किंवा काही काळाने प्राप्तिकराच्या दरामध्ये सुद्धा कपात करेल, हे निश्चित आहे. मात्र प्राप्तिकराचे दर कमी झाल्यानंतर प्राप्तिकराबाबत मिळणारी सवलत संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यताही विवेक देवरॉय यांनी वर्तवली आहे.

नीती आयोगाचे माजी प्रमुख अरविंद पानगडिया यांना प्रप्तिकरातील कपातीवर सांगितले की, टॉप पर्सनल इन्कम टॅक्स रेट, कॉर्पोरेट प्रॉफिट टॅक्स रेटच्या बरोबरीमध्ये 25 टक्क्यांवर आणून सवलत संपुष्टात आणल्यास भ्रष्टाचाराला लगाम लागेल. तसेच कराबाबत निर्माण होणारे वादही संपुष्टात येतील. तसेच टॅक्सचा बेस वाढल्याने टॅक्सच्या दरात झालेल्या कपातीचा फटका महसुलावर होणार नाही.

प्राप्तिकर म्हणजे आयकर विभागाने प्राप्तिकराच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्सने ऑगस्ट महिन्यातच आपला अहवाल सरकारकडे सोपवला आहे. यात कराच्या दरात मोठी कपात करुन 5,10,20 टक्के असे टॅक्स स्लॅब तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हे टॅक्स स्लॅब 5 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के असे आहेत.

महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी देखील प्राप्तिकराच्या दराबाबत बोलताना सांगितले की प्राप्तिकराबाबत कोणताही रेव्हेन्यू घेण्याआधी महसूल कुठून मिळवता येईल, अर्थसंकल्पाच्या गरजा आणि वित्तीय तूट हे विचारात घ्यावे लागेल. प्राप्तिकरात म्हणजेच आयकरात सवलत मिळाल्यास सामान्यांच्या हातात आधिक पैसे येतील. यामुळे खरेदी क्षमता (क्रयशक्ती) वाढून बाजारात असलेली सुस्ती दूर होईल. टॅक्स स्लॅबमध्ये बदल केल्यास सरकारच्या तिजोरीवर 1 लाख 75 हजाराचा बोझा वाढेल. त्यात 1 लाख कोटीचा बोजा केंद्र सरकारवर आणि 75 हजार कोटींचा बोझा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like