हवामान खात्यावर अफवा पसरवण्याबाबत FIR दाखल करा : राज ठाकरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दोन दिवसांपासून हवामान खात्याने अनेदा पूर जन्य परिस्थितीचे आव्हाने दिली. मात्र ज्या भागात हवामान खात्याने रेड अर्लट दिला होता. तेथे काहीच पाऊस झाला नाही. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट हवामान खात्याविरोधात अफवा पसरविण्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच केली आहे. ते एका सभेत बोलत होते.

हवामान खात्यात नेमकं कोण बसले आहे काय माहित. ५ ऑगस्ट रोजी पावसाचा इशारा होता, आम्हाला कार्यक्रम रद्द करावा लागला पण पाऊस पडलाच नाही, अशी टीका त्यांनी हवामान खात्यावर केली. तसंच त्यानंतर त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. राज्यात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला आहे. मात्र मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने फिरत आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर खाली येत नाही. तर गिरीश महाजन सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत. या लोकांना लाज आणि चिंता काहीच वाटत नाही. कारण काही झाले तरी हेच निवडून येतील हे त्यांना माहित आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजयी होऊ, असं एका भाजप नेत्याने मला सांगितले. कसे? विचारले तर कारण विरोधी पक्षांकडे यंत्र नाही, असं उत्तर आल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.

तसंच राज यांनी यावेळी कलम ३७० हटवण्याबाबत प्रतिक्रियी दिली. कलम ३७० हटवल्यानंतर सर्व लोक पेढे वाटत आहेत. पण महाराष्ट्राबाबत असलेले कलम ३७१ वर कोणी बोलत नाही. आतंकवादी विरोधी कायद्यात सुधार करण्यात आला आहे. त्यानुसार थोडा संशय असला तरी त्या व्यक्तीला आतंकवादी म्हणून घोषित करण्यात येईल. हा अधिकार कोणाला मिळाला आहे. अमित शहांना का? उद्या कोणालाही तुरुंगात टाकतील मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी खटला लढवत बसा, असंही त्यांनी यावेळी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –