राखीचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल… युजर्सने केल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – TikTok हे अ‍ॅप आता नुकतंच भारतात बॅन झालं आहे. यानंत आता सगळीकडे त्याची चर्चा होताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी गुगल प्ले स्टोअरवरूनही या अ‍ॅपला हटवण्यात आलं आहे. या घटनेनंतर आता टिकटॉक युजर्स खूपच नाराज असल्याचं दिसत आहे. अशातच आता राखी सावंतने सोशल मीडियावर तिचा टिकटॉक व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमी चर्चेत राहणारी राखी हा व्हिडीओ शेअर करून पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडीओत राखी चक्क रडताना दिसत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानचा सिनेमा कल हो ना हो च्या टायटल ट्रॅकची ट्यून वाजताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र राखीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याचेही दिसत आहे. एकाने तर या व्हिडओवर खोचक कमेंट करत म्हटले आहे की, “दीपक कलालची आठवण येते.” आणखी एकाने म्हटले आहे की, “एक चांगला टाईम पाहून विष का नाही पीत तू ?” एकाने असेही म्हटले आहे की, “तू मरत का नाहीस?”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like