आता रामदेव बाबांना ‘हे’ बाबा देणार कडवी टक्कर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

अगदी कमी कालावधीत व्यावसायामध्ये पतंजलीने आपली वेगळी अोळख निर्माण केली आहे. त्यामुळे इरतही देशी कंपन्या बाबांच्या पतंजलीला आता टक्कर देण्याची तयारी करत आहेत. रामदेव बाबांच्या पतंजलीला आर्ट आॅफ लिव्हिंगच्या श्री श्री रवीशंकर यांच्याकडून चांगलेच व्यावसायिक आव्हान मिळणार आहे. रवीशंकर यांची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी जाहिरातींवर तब्बल 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. आयुर्वेद आणि हर्बल क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी श्री श्री यांच्या ब्रॅंडची देशभरात एक हजार दुकानं उघडण्यात येणार आहेत. या उत्पादनांना मार्केटमध्ये आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसापूर्वी आयपीएल स्पर्धेवेळी श्री श्री यांच्या कंपनीनं जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च केले होते.श्री श्री तत्व नावानं दुकानं सुरू करणाऱ्या श्री श्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनी वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे. यासाठी सर्वसमावेशक व आक्रमक जाहिरातबाजी करण्यावर भर दिला जाणार आहे.
किती खर्च केला जाणार आहे याची माहिती दिलेली नाही. तर जाहिरात एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार श्री श्री तत्व जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे.

चालू आर्थिक वर्षात तीन-चार मोठी जाहिरात अभियाने हाती घेतली जाणार आहेत. या जाहिराती वृत्तवाहिन्यांसह मनोरंजन आणि प्रादेशिक वाहिन्यांवरदेखील दाखवल्या जातील. याशिवाय आॅन ग्राऊंड आणि आऊटडोर जाहिराती देखील करण्यात येणार आहेत.अशी माहिती कटपिटिया यांनी दिली आहे.मात्र या सर्व कार्यक्रमासाठी