LPG गॅस घरगुती सिलेंडरचे या पध्दतीनं करा ऑनलाइन बुकिंग, 50 रूपयांनी मिळेल स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गॅस सिलेंडरचे ऑनलाइन पद्धतीने बुकिंग (Gas Cylinder Online Booking) करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. जर तुम्ही Amazon Pay च्या माध्यमातून गॅस बुकिंग केले तर तुम्हाला ५० रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. पहिल्या वेळेस बुकिंग केले तर हा कॅशबॅक मिळणार आहे.

यासंदर्भात सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडेनने ट्विट करुन माहिती दिली आहे. घरगुती गॅस धारक Amazon Pay च्या माध्यमातून आता बुकींच करु शकतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे. इंडेन रिफिलसाठी तुम्ही ऑनलाइन बुकिंगचा मार्ग अवलंबू शकता. पहिल्यांदा हे बुकिंग केल्यावर तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

असे करा बुकिंग

त्यासाठी तुम्हाला Amazon Pay अ‍ॅपच्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा गॅस प्रोव्हायडर निवडा आणि त्याठिकाणी रजिस्टर केलेला मोबाइल क्रमांक, गॅस क्रमांक टाका, मग तुम्ही पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करु शकता.

इंडेनने रिफिलसाठी जारी केला नवा क्रमांक

सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने इंडेनचे आपला जुना क्रमांक बंद केला असून, त्यावरुन आता तुम्ही एलपीजी गॅसचे बुकिंग करु शकणार नाही. देशभरातील ग्राहकांसाठी कंपनीने एकच नंबर जारी केला. यापुढे इंडेनच्या ग्राहकांना एलपीजी गॅस बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.

डिलिव्हरीसाठी OTP सुविधा

दरम्यान, आता ग्राहकांना सिलेंडरची डिलेव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code) या प्रणाली अंतर्गत गॅस सिलेंडर बुक केल्यावर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुम्हाला रजिस्टर्ड फोन क्रमांक एक कोड पाठवण्यात येईल. त्यानुसार डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला हा कोड सांगावा लागेल.

You might also like