लवकरच रिलीज होणार ममता बॅनर्जींवर आधारीत ‘हा’ सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट तयार झाला असून तो आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सध्या हा सिनेमा काँट्राव्हर्सीमध्ये आहे. हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत आहे. आता सिनेमानंतर आता आणखी एक सिनेमा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. वाघिणी- बंगाल टायग्रेस असं या चित्रपटाचं नाव आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे.

या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून नुकताच क्लिअरन्स भेटला आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाच्या निर्मात्या नेहल दत्ता यांनी दावा केला आहे की, हा एक बायोपिक नसून ममता यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनावर लिहलेली एक गोष्ट आहे. याबाबत बोलताना नेहल दत्ता म्हणाल्या की, “मोदींच्या सिनेमासारखं आमचा सिनेमा हा बायोपिक नाही. तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही त्यांच्यापासून प्रेरीत झालो आहोत. त्या एक आदर्श आहेत. महिला सशक्तीकरणाची ही एक भावूक गोष्ट आहे.” असे दत्ता यांनी सांगितले.

या सिनेमात ममता बॅनर्जी यांची भूमिका थिएटर आर्टीस्ट रूम चक्रवर्ती यांनी साकारली आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, माकपाने निवडणूक आयोगाकडे या सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थिगिती देण्याची मागणी केली आहे.

Loading...
You might also like