‘फ्लिपकार्ट’वर आता हिंदीमध्ये खरेदी, कंपनीनं सुरू केली ‘सेवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉलमार्टची मालकी असलेल्या सर्वात मोठी ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता आपल्या ग्राहकांसाठी नवीन भाषेत सेवा घेऊन येणार आहे. हिंदी भाषेत हि नवीन सेवा सुरु होणार असून याद्वारे 20 कोटी ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऑनलाईन खरेदीचा कल पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे छोट्या शहरातील ग्राहकांना देखील ऑनलाईन खरेदीचा फायदा घेता येणार आहे.

भारतातील नवीन माहितीनुसार, इंटरनेटचा वापर करणारे 90 टक्के भारतीय नागरिक आपल्या मातृभाषेचा वापर करतात. त्यामुळे कंपनीने देखील हिंदीमध्ये हि सेवा देण्याचा निर्णय घेतला असून 2021 पर्यंत हिंदीचा वापर करणाऱ्यांची संख्या इंग्रजीपेक्षा पुढे जाणार आहे.  कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयंद्रन वेणुगोपाल यांनी म्हटले कि, सध्या खरेदी करताना तुमच्या मातृभाषेत माहिती मिळणे फार महत्वाची गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला वस्तूंची योग्य माहिती मिळते. त्यामुळे आम्ही ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हिंदीमध्ये सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यामुळे ऑनलाईन खरेदीच्या क्षेत्रात मोठा बदल होणार असून यामुळे इतर कंपन्या देखील अशाचप्रकारे मातृभाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.