‘त्या’ पुरुषांना देखील मिळणार ७३० दिवसांची पगारी बालसंगोपन रजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदार महिलांना बालसंगोपनासाठी तसेच प्रसूतिकरिता पगारी रजा दिली जाते. पालकत्व स्वीकारलेल्या केंद्रीय पुरुष कर्मचाऱ्यांना देखील पूर्ण नोकरीच्या काळात ही ७३० दिवसांची रजा घेता येणार आहे. ज्या पुरुषांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्यांना आता चाइल्ड केअर लीव्ह (सीसीएल) मिळणार आहेत. आतापर्यंत अशी रजा महिलांनाच देता येत होती. परंतु आता अशा प्रकारची रजा पुरुषांनाही मिळणार आहे.
महिला कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी ३ टप्प्यात मुलांच्या देखभालीसाठी सुट्ट्या दिल्या जातात. परंतु या सुट्ट्यांची मर्यादा फक्त दोन मुलांपर्यंत मर्यादित असते. लग्न न केलेले, घटस्फोट घेतलेल्या पुरुष या चाइल्ड केअर लीव्हसाठी पात्र ठरणार आहेत. तत्पूर्वी महिलांनाच मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळत होती. परंतु आता पुरुषांनाही तशी रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) सरकारी संस्थांना हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात सरकारी महिला कर्मचारी आणि सिंगल पुरुषाने पालकत्व स्वीकारलेले असल्यास त्यांना ७३० दिवसांची रजा मिळाली पाहिजे.
DoPT च्या शिफारशीनुसार, सुरुवातीला ३६५ दिवसांत १०० टक्के पगार आणि इतर ३६५ दिवसांत ८० टक्के पगार दिला गेला पाहिजे. पालकत्व स्वीकारलेल्या सिंगल पुरुषाच्या या नियमाला अद्याप स्वीकारलं गेलेलं नाही. पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतला असेल किंवा तिचं निधन झालं असल्यास एकट्याच पुरुषाला मुलांचा सांभाळ करावा लागतो. अशा स्थितीत त्या एकट्या पुरुषावर मुलाची जबाबदारी असते मुलांनाच योग्य रीतीने संभाळा करता यावा याकरिता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.