भीमा कोरेगाव हिंसाचारातील दलितांवरील गुन्हे मागे घ्या, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारताच आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हे रद्द केले. तसेच भाजपचे आमदार निलेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक पाऊल उचलले होते.

नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे गुन्हे मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदारांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हे माफ करण्याची मागणी केली आहे. भीमा कोरेगांव प्रकरणात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिए यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Visit : policenama.com