सावधान ! आता कारमध्ये मुलांसाठी बूस्टर सीट आणि दुचाकींवर हेल्मेट बंधनकारक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी लोकसभेत मोटर वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा करण्यासाठी नवीन विधेयक सादर केले. या विधेयकात सुधारणा केल्यानंतर यापुढे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी देखील यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. नवीन विधेयकात लहान मुलांना देखील हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी देखील काही तरतूद करण्यात आली आहे. यापुढे कारमध्ये मागे बसणाऱ्या मुलांसाठी देखील चाइल्ड रिस्ट्रेंन सिस्टम अनिवार्य करण्यात येणार आहे. यामध्ये एक चाईल्ड सीट असते ज्यामध्ये लहान मुलांना बसवल्यानंतर सीट बेल्ट लावला जातो. त्यामुळे आता यापुढे लहान मुलांच्या सुरक्षेची देखील मोठ्या प्रमाणात गाडी बनवताना काळजी घेण्यात येणार आहे.

अपघातात मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये

या नवीन विधेयकात यापुढे रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांना सरकारकडून पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. या संबंधी प्रश्नावर उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले कि, रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता थेट पाच लाख रुपये मदत मिळणार आहे. त्याचबरोबर जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत. मोटर व्हेईकल (संशोधन) बिल २०१९ ला मंत्रिमंडळाने मजुरी दिल्यानंतर हे संसदेत मांडले गेले आहे.

शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास १००० दंड

त्याचबरोबर शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास १००० रुपये दंड घेण्याची देखील या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या नियमाचा दुसऱ्यांदा भंग केल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्याची देखील शिफारस या विधेयकात करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like