आता राज्यात काँग्रेसचे ‘सोशल इंजिअरिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात ‘घरच्यां’नीही दगाफटका केल्याने आता संघटनबांधणी करताना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसल्याचा मुद्दा लक्षात घेऊन कृती करावी लागणार आहे. त्यानुसार आता विरोधी पक्षनेतेपदावर दलित, ओबीसी आणि मराठा यापैकी कोणता चेहरा देता येईल यासाठी चाचपणी सुरु असून आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त हा ‘सोशल इंजिनिअरिंग’ चा प्रयोग करण्याबाबत विचारमंथन सुरु झाले आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.👇👇

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या तब्बल दहाहून अधिक जागांना मोठा फटका बसला होता. हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहिली तर, काँग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे वंचित आघाडीला पर्यायी म्हणून काँग्रेसमध्ये दलित अथवा मुस्लिम चेहरा देता येईल काय अथवा त्यासोबतच ओबीसी किंवा मराठा चेहरा लाभदायी ठरेल का? अशा स्वरूपाची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाली आहे . तर, राज्यातील दलितांना पुन्हा काँग्रेसच्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसच्या दलित नेत्यांना खास जबाबदारी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड यांची नावे यासाठी निश्चित केली असल्याचे सांगितले जात आहे.मात्र विरोधीपक्षनेत्याची माळ कुणाच्या गळ्यात पडते यापेक्षा त्यावरून काँग्रेसमध्ये पुन्हा राजकारण पेटते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.