आता बोगस मेसेज अाेळखा, व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

तुमच्या व्हाॅट्सअॅपवर वारंवार मेसेजेसचा भिडीमार होत असतो. यामुळे तुमच्या कामात अनेकदा अडथडे येतात. मात्र आता व्हाॅट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. ज्यामध्ये येणारे मेसेज बाेगस असल्याची तुम्हाला खात्री करता येणार अाहे. यामध्ये फाॅरवर्ड केलेले मेसेज किंवा काॅपी-पेस्ट केलेले मेसेज नवीन केलेल्या बदला नुसार तुम्हाला आेळखता येणार आहे.

अॅण्ड्राॅइड बीटा २.१८.१७९ हे नवीन फीचर व्हाॅट्सअॅपने आणले अाहे. यामध्ये एखादा मेसेज फाॅरवर्ड केला आहे की टाइप करुन पाठवला आहे हे आता नवीन फीचर मुळे कळणार आहे. जसे की वापरकर्त्याने व्हाॅट्सअॅपवर एखादा मेसेज फाॅरवर्ड हा पर्याय निवडून इतरांना पाठवला असेल तर, त्या मेसेज मध्ये वरच्या भागात ‘फाॅरवरर्डेड’ असे दिसणार. तेव्हा हा मेसेज ज्याला पाठवला आहे, त्याला फाॅरवर्ड मेसेज आहे. हे यावरुन कळुन येणार.तसेच एखादा मेसेज काॅपी-पेस्ट करुन पाठवल्यास त्या मेसेजमध्ये ‘फाॅरवर्डेड’ असे दिसणार नाही.असे नवीन फीचर व्हाॅट्सअॅपने अाणले आहे.