पोलिसांवर आता कोंबड्या शोधण्याची पाळी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या आहेत, पण खुद्द जामनेरचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांनाच चोरीच्या कोंबड्या शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जळगावातील शेंदुर्णी गावामध्ये राहणाऱ्या भोळा गुजर यांच्या पोल्ट्री फार्ममधून सातत्याने कोंबड्या चोरीला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

[amazon_link asins=’B01KURGS9Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b785787-9df6-11e8-8e90-c1308cff194a’]

पोल्ट्री फार्ममधून काही महिन्यांपासून कोंबड्यांची चोरी होत असल्याचे भोळा गुजर यांच्या निदर्शनास आले. कोंबड्या चोरीमुळे गुजर यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. या घटनेच्या तक्रारी गुजर यांनी सातत्याने पोलिसांकडे केल्या मात्र कोंबडी चोरीच्या कोणत्याही घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही.

अखेर वैतागून भोळा गुजर यांनी आपल्या कोंबड्यांच्या चोरीचे आणि पोलीस दखल घेत नसल्याची कैफियत गिरीश महाजन यांच्या पुढे कथन केली.  महाजन यांनी गुजर यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तळागाळातील लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजनांनी कोंबडी विक्रेत्याच्या तक्रारीची  गंभीर दखल घेण्याच्या सूचना केल्याने आता पोलिसांना कोंबडीचोरांचा आणि कोंबड्या शोधण्याची वेळ आली आहे.