‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आणि ‘ई-चलन’बाबत बदलत आहेत नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बहुतेक लोक असा विश्वास करतात की बनावट कागदपत्रे दाखवून वाहतूक पोलिसांना टाळता येऊ शकते. हे खरं देखील आहे कारण बर्‍याच राज्यात ट्रॅफिक पोलिसांकडे कागदपत्रांची तातडीने पडताळणी करण्याची सुविधा नसते. पण आता असं होणार नाही. आता आपले प्रत्येक कागदपत्र आधीपासूनच ट्रॅफिक अधिकाऱ्यांजवळ उपस्थित असेल.

नाही देऊ शकणार चकवा
केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा 1989 मध्ये दुरुस्ती केली आहे. सरकारने शनिवारी सांगितले की, एका माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टलद्वारे 1 ऑक्टोबर 2020 पासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चालानसह वाहनांसंबंधित कागदपत्रे राखली जातील. एका निवेदनात म्हटले आहे की वाहन कागदपत्रांच्या तपासणी दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वैध आढळलेल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या बदल्यात भौतिक कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही.

आपल्या लायसन्सची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल
तज्ञांचे म्हणणे आहे की आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित सर्व माहिती ट्रॅफिक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल. यासह, सरकारने म्हटले आहे की परवाना प्राधिकरणाने अपात्र ठरविलेले किंवा रद्द केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील पोर्टलमध्ये नोंदविला जाईल आणि वेळोवेळी अपडेट केला जाईल.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या विविध सुधारणांबाबत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये मोटार वाहन नियमांच्या चांगल्या देखरेखीसाठी आणि अंमलबजावणीसाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून पोर्टलमार्फत वाहन संबंधित कागदपत्र आणि ई-चालान राखता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like