आता सहज दुसऱ्याच्या नावावर करता येईल ‘वाहन’, माराव्या लागणार नाहीत RTO च्या फेर्‍या, जाणून घ्या

नवी दिल्ली : आपल्या देशात गाडी खरेदी करणे सोपे असले तरी ती आपल्या नावावर करणे म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात, मात्र लवकरच यापासून सूटका होणार आहे. कारण रस्ते आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने वाहन ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन कायद्यात (CMVR) दुरूस्तीचा प्रस्ताव दिला आहे. नव्या प्रस्तावानुसार गाडीचा मालक व्हेकल रजिस्ट्रेशननंतर सुद्धा ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून कुणालाही नॉमिनी बनवू शकतो.

माराव्या लागणार नाहीत आरटीओच्या फेर्‍या
या प्रस्तावानंतर गाडीच्या मालकाच्या मृत्यूच्या प्रकरणात कोणत्याही अडचणीशिवाय वाहन ट्रान्सफर करता येईल. आता सदस्य /नामांकित व्यक्तीला सतत वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाणे आणि अनेक प्रकारची माहिती आणि डॉक्युमेंट जमा करण्याची गरज असणार नाही. याशिवाय, कर्मिशयल व्हेकलच्या प्रकरणात अनेकदा वाहनाचे परमिट रद्द होते. अशावेळी त्या वाहनाचा वापर करण्याची परवानगी पुन्हा मिळवणे अवघड होते.

आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन
मोटर वाहनाच्या नामांकित व्यक्तीला मालकाच्या मृत्यूच्या बाबतीत वाहनाचा कायदेशीर उत्तराधिकारी बनण्यासाठी ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. जर नामांकित व्यक्ती अगोदरपासूनच नॉमिनी असेल, तर वाहन त्याच्या नावावर ट्रान्सफर केले जाईल आणि नामांकित व्यक्तीला पोर्टलवर डेथ सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल आणि पोर्टलच्या माध्यमातून त्याच्या नावाने रजिस्ट्रेशनच्या नव्या सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावे लागेल जे आधार कार्डद्वारे व्हेरिफाई केले जाईल.

You might also like