आता महिलांसाठीही ‘वायग्रा’, जाणून घ्या स्वरुप आणि फायदे !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुरुषांना इरेक्शन किंवा सेक्ससंबंधी काही अडचणी असतील तर अनेकजण वायग्राचा वापर करतात. पुरुषांप्रमाणे काही महिलाही अशा असतात ज्यांच्यामध्ये सेक्सची इच्छा कमी आहे. त्यांच्यासाठी असणाऱ्या वायग्राला आता मंजुरी देण्यात आली आहे. महिलांची सेक्सची इच्छा कमी असेल तर उत्तेजित होण्यासाठी त्या आता वायग्राचा वापर करू शकतात. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या वायग्राला मंजुरी दिली आहे.

ही वायग्रा पुरुषांच्या टॅब्लेटप्रमाणे नाही. या वायग्राचे स्वरुप थोडे वेगळे आहे. महिला स्वत: घेऊ शकतात अशा स्वरुपाच्या इंजेक्शनच्या रुपात ही वायग्रा असणार आहे. विशेष महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या वायग्राला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने(FDN) मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या रजोनिवृत्तीच्या चक्रावरही याचा कोणता परिणाम झाल्याची लक्षणे नाहीत. परंतु त्या महिला हायपो अ‍ॅक्टीव सेक्शुअल डिजायर डिसॉर्डर(HSDD) आहेत.

HSDD पीडित 1200 महिलांवर 24 आठवडे ‘या’ वायग्राणी चाचणी
या चाचणीमध्ये महिन्यातून दोन ते तीन वेळा महिलांना वायग्राचं इंजेक्शन देण्यात आलं.  यावेळी 25 टक्के महिलांनी त्यांची लैंगिक भावना वाढल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे कोणत्याही महिलेला एका आठवड्यात एकापेक्षा जास्त वेळा हे इंजेक्शन दिलं गेलं नाही.

इंजक्शन कसं काम करतं ?
या इंजेक्शनचा फायदा असा होईल की, तुमची भीती कमी होईल. डोपामाईन आणि सिरोटोनिन हे दोन न्यूरोट्रान्समीटर यामुळे नियंत्रणात ठेवले जातात. या वायग्राच्या  उत्पादकांचा असा दावा आहे की, सिरोटोनिनचा स्राव रोखणं आणि डोपामाईनचं प्रमाण वाढवणं अशी कामे हे इंजक्शन करतं. महत्त्वाची बाब  अशी की, या इंजक्शनसाठी मद्यपान सोडावं अशी कोणती अटही नाही. याचे दुष्परिणाम तसे पाहिले तर कमीच आहेत. विशेष म्हणजे हे इंजक्शन दररोज घेण्याची गरज नाही.  उत्पादकांनी असंही सांगितलं आहे की, याचा परिणाम खूपच लवकर दिसून येतो. अमेरिकेतील अंदाजे 6 ते  10 टक्के महिलांना HSDD ची समस्या असल्याचं दिसून आलं आहे.

काय म्हटलं एफडीएन ?
एफडीनएनने म्हटल्यानुसार, “महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होण्याचं कारण आतापर्यंत समजू शकलेलं नाही. परंतु अशी समस्या असणाऱ्या महिलांसाठी मात्र हे औषध म्हणजे सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. सेक्सची इच्छा कमी असणाऱ्या महिलंसाठी या औषधाच्या मंजुरीने उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.”

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like