LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी खुशखबर ! आता बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या देशात, सर्व लोकांच्या घरात कमीत कमी एका व्यक्तीची एलआयसी पॉलिसी असतेच. परंतु देशातील या सरकारी कंपनीने पुन्हा एकदा आपल्यासाठी एक विशेष योजना आणली आहे. या योजनेंतर्गत ग्राहक आपली जुनी पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात. यासाठी कंपनीकडून एक विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली जात आहे, ज्याद्वारे आपण पुन्हा आपली पॉलिसी सुरू करू शकता.

लॅप्स झालेली पॉलिसी सुरू करता येईल :
बर्‍याच वेळा असे घडते की पॉलिसी धारक काही कारणास्तव त्याच्या पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी अयशस्वी ठरतो . अशा परिस्थितीत ग्राहकांची पॉलिसी बंद होते. मात्र आता आपण अशी बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता.

१५ नोव्हेंबरपर्यंत मुदत :
यासंदर्भात एलआयसीने ट्विट केले की कंपनीची ही विशेष पुनरुज्जीवन मोहीम १६ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान, आपण आपले कोणतेही जुनी पॉलिसी पुन्हा एकदा सुरू करू शकता. परंतु केवळ असे लोकच या पॉलिसीचा फायदा घेऊ शकतात ज्यांनी आपली पॉलिसी सरेंडर केलेली नाही.

कंपनीला लेट फी भरावी लागणार :
एलआयसीचे लॅप्स झालेली पॉलिसी सुरू करण्यासाठी तुम्हाला कंपनीला लेट फीच्या रूपात काही रक्कम द्यावी लागेल. मात्र यावर काही सुतदेखील मिळणार आहे. तुम्हाला किती रुपयांच्या पॉलिसीवर किती सूट मिळेल ते आम्ही याठिकाणी सांगत आहोत – १ लाख रुपयांच्या रकमेवर २० टक्के सूट मिळणार असून जास्तीत जास्त १५०० रुपये सूट मिळेल. १ लाख ते ३ लाखांपर्यंतच्या रकमेवर २५ टक्के सूट मिळणार असून जास्तीत जास्त सूट २००० रुपये असेल. ३ लाखांपेक्षा जास्त रकमेवर ३० टक्के सूट मिळणार असून जास्तीत जास्त सूट २५००० रुपये असेल.

बरेच फायदे मिळणार :
मिळालेल्या माहितीनुसार, पॉलिसी पुनरुज्जीवित केल्यास ग्राहकांना अन्य फायदे देखील मिळतील. म्हणजेच जर पॉलिसीधारक कोणत्याही कारणास्तव मरण पावला तर त्या व्यक्तीच्या पॉलिसीचे पैसे त्या नॉमिनीला मिळतील. परंतु विशेष पुनरुज्जीवन मध्ये, पॉलिसी एकदाच सुरू केली जाऊ शकते. यासह, पॉलिसी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लॅप्स झालेली असू नये अशीही अट आहे.

Visit : policenama.com