आता WhatsApp वरूनही पैसे ट्रान्सफर करता येणार, NPCL ची माहिती

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatSApp) च्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होत होते. परंतू आता व्हॉट्सअ‍ॅपने लॉंंच केलेल्या युपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात युपीआय आधारीत पेमेंट सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. भारतातील व्हॉटसअ‍ॅपचे युजर्स पाहता भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉटसअ‍ॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्व्हीस गुगुल पे (googal pay) आणि पेटीएमला (Paytm) टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ( NPCL) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात युपीआय आधारीत सिस्टम सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जुन महिन्यात व्हॉटसअ‍ॅपने पेमेंट सेवा सुरु केली होती. परंतू ही सेवा वारण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळाली होती. आता देखील NPCLने काही मोजक्या क्रमांकानाव्हॉट्सअ‍ॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतू आगामी काळात कंपनी ही मर्यादा वाढवणार आहे.

NPCL ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप या मंजुरीच्या प्रतिक्षेता होता. कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेतली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉटसअ‍ॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युपीआयवर जास्तीत जास्त 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन आपला युपीआय युजर बेस वाढवू शकतो, अशी माहिती NPCL ने दिली आहे. परंतु या संदर्भात अद्याप व्हॉटसअ‍ॅप कडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

व्हॉटसअ‍ॅपने फेब्रुवारी 2018 मध्ये भारतात आपल्या युपीआय बेस्ड पेमेंट सेवेची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सेवा सुरु करणार आहे. भारतातील व्हॉटसअ‍ॅपचे युजर्स पाहता भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.