जवळच्या RTO ऑफीसमध्ये बनवा DL, 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोटार वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. याविषयी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार असून, रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही नियम तोडल्यास यापुढे मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.

राज्यात कुठूनही काढा वाहन परवाना
1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार असून यामुळे तुम्ही वाहन परवान्यासाठी राज्यातून कुठेही अर्ज करू शकता. जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला वेगळ्या जिल्ह्यात अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आरटीओच्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही त्या जिल्ह्यातून देखील वाहन परवान्यासाठी अर्ज करू शकता.

सध्या ऑनलाईन नाही सुविधा
नवीन सुधारित विधेयकानुसार हि व्यवस्था ऑनलाईन नसून तुम्हाला थेट आरटीओ कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर फॉर्म्सची संख्या देखील कमी करण्यात आली असून यामुळे अर्ज करणाऱ्याला मदत मिळणार आहे.

1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार
मोटार वाहन अधिनियम विधेयकामध्ये बदल केल्यानंतर हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले असून ते सध्या मंजुरीसाठी कायदे मंत्रालयाकडे पाठवले असून त्याच्या मंजुरीची वाट पहिली जात आहे. याबाबत गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत याला मंजुरी मिळणार असून 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. राष्टपतींचे या विधेयकावर हस्ताक्षर झाले असून हा कायदा लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like