आता संपूर्ण देशात ‘या’ एकाच नंबरवर बुक करू शकता गॅस सिलेंडर, जूना नंबर करा डिलिट

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडेनचे ग्राहक आता देशात कुठूनही एकाच नंबरवर एलपीजी सिलेंडर बुक करू शकतात. देशातील या सर्वात मोठ्या आईल मार्केटिंग कंपनीने नवा नंबर जारी केला आहे. म्हणजे आता जुन्या नंबरवर गॅस बुकिंग होणार नाही. आता जुना नंबर लिलिट करून नवा नंबर तुम्हाला सेव्ह करावा लागेल. कंपनीने सुद्धा ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आपला नवा गॅस बुकिंग नंबर पाठवला आहे.

हा आहे गॅस बुकिंगसाठी नवा नंबर
इंडेन गॅसच्या देशभरातील ग्राहकांना एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी आता 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. इंडियन ऑईलकडून जारी करण्यात आलेल्या या नंबरचा वापर इंडेनचे देशभरातील ग्राहक आयव्हीआर किंवा एसएमएसद्वारे गॅस बुकिंगसाठी करू शकतात. इंडियन ऑईलने सांगितले की, अगोदर स्वयंपाकाचा गॅस बुकिंग करण्यासाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे नंबर होते. आता देशभरातसाठी एकच नंबर करण्यात आला आहे.

ग्राहकांना आता एसएमएस किंवा कॉलद्वारे गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आपल्या रिजस्टर्ड मोबाईल नंबरवरून कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या नव्या नंबरचा वापर करावा लागेल. कंपनीने म्हटले आहे की, एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगनंतर सबसिडीचे पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही सहज चेक करता येईल.

ओटीपी डिलिव्हरी सिस्टम लागू
डोमॅस्टिक सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्यांनी नवी एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सिस्टम लागू केली आहे. या अंतर्गत 1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी पोहचेल तेव्हा तुम्हाला त्यांना वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी सांगावा लागेल. 1 नोव्हेंबरपासून 100 स्मार्ट सिटीजमध्ये डिलिव्हरीसाठी ओटीपी अनिवार्य झाला आहे.