तुमच्या चांदणी ला चंद्र नाही तर चंद्राचा तुकडा भेट देऊ शकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. त्यात पूर्ण चंद्र तर नाही पण तुम्ही तुमच्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा नक्कीच देऊ शकाल. एका कंपनीने चंद्राचा तुकडा विकायला काढला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’023b4648-ce29-11e8-b34c-9fd38526474e’]

आफ्रिकेतील मौरितानियामध्ये वैज्ञानिकांनी हा तुकडा २०१७ मध्ये  शोधला होता. हा तुकडा १२ पाऊंड(५.५ किलो) वजनाचा आहे. बॉस्टनच्या ‘आरआर आॅक्शन कंपनी’ चंद्राच्या या तुकड्याचा ५ लाख अमेरिकन डॉलर(साधारण ४ कोटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीत लिलाव करत आहे. १८ आॅक्टोबरला यावर बोली लावली जाणार आहे.

मंदिराच्या पायरीवर नवजात अर्भक सापडले

चंद्राचा तुकडा म्हणजेच लूनर मीटिआॅरायटचा लिलाव करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, जगभरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उल्कापिंडांमध्ये हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कारण हा चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा आहे. या दगडाला एनडब्लूए ११७८९ हे नाव देण्यात आले आहे. तसेच याला बुआगाबा नावानेही ओळखले जाते.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15551ac6-ce29-11e8-9c1d-712ae271325c’]

लूनर मीटिआॅराइट हजारो वर्षांपूर्वी जमिनीवर पडला होता. हा तुकडा सहा खंडांनी मिळून तयार झाला आहे. यातील सर्वात मोठ्या तुकड्याचे वजन साधारण ६ पाऊंड इतके आहे. चंद्रातून निघालेल्या जास्तीत जास्त मिटिआॅराईट (उल्कापिंड) चा आकार अक्रोड किंवा गोल्फच्या बॉल इतका असतो. मीटिआॅर विकणारी कंपनी एअरोलाइट मटियोराइट्सचे सीईओ जियॉफ नोटकिन म्हणाले की, ‘हा तुकडा पाहता क्षणीच हे कळाले होते की, हा खास आहे. हा आयुष्यभर शोधल्यानंतर एकदा मिळणाऱ्या वस्तूसारखं आहे.

बाल सुधारगृहातून पाच अल्पवयीन मुलांचे अपहरण

हा उल्कापिंड कोणत्याही म्युझिअमसाठी अमुल्य ठरु शकतो. आरआरचे कार्यकारी उपाध्यक्ष रॉबर्ट लिविंगस्टोन म्हणाले की, खाजगी रुपाने कोणत्याही व्यक्तीला चंद्राचा हा तुकडा विकत घेण्याची संधी आहे. कारण अंतराळातून जे तुकडे आणले जातात, ते अमेरिकेची संपत्ती आहेत.