CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

नवी दिल्ली : सरकारने कोविन CoWin पोर्टलसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटनंतर कोविनवरच आपल्या व्हॅक्सीनच्या सर्टिफिकेटमधील चूक सुधारता येऊ शकते. जर रजिस्ट्रेशनच्या दरम्यान नाव किंवा जन्म तारखेत काही चूक झाली असेल तर तुम्ही कोविन CoWin पोर्टलवर लॉगिन करून त्यामध्ये सुधारणा करू शकता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी बुधवारी सांगितले की, वापरकर्ते कोविन वेबसाइटद्वारे ही सुधारणा करू शकतात.

कशी करावी व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये सुधारणा

1. सर्वप्रथम http://cowin.gov.in वर जा.

2. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पोर्टलवर लॉगिन करा.

3. आता तो आयडी सिलेक्ट (मल्टीपल रजिस्ट्रेशनच्या स्थितीत) करा ज्यामध्ये सुधारणा करायची आहे.

4. आता तुम्हाला आयडीच्या खाली Raise an Issue चा पर्याय दिसेल.

5. Raise an Issue वर क्लिक करून तुम्ही लिंग, जन्म तारीख, नाव इत्यादीत सुधारणा करू शकता.

अनेक देशात आणि राज्यांत प्रवासासाठी व्हॅक्सीन सर्टिफिकेट अनिवार्य झाले आहे.

अशावेळी सर्टिफिकेटमध्ये कोणतीही चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते.

तुमचे ओळखपत्र आणि व्हॅक्सीन सर्टिफिकेटमधील माहिती एकच असावी.

सोशल मीडियावर शेयर करू नका सर्टिफिकेट

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था सायबर दोस्तने ट्विट करत सांगितले आहे की, कोरोना व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये महत्वाची वैयक्तिक माहिती असल्याने ते सोशल मीडियाव शेयर करणे महागात पडू शकते.

 

Also Read This : 

Ratan Tata | यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा रतन टाटा यांच्या ‘या’ 6 गोष्टी ! मोठ्या कमाईसोबतच तुम्ही व्हाल सर्वांचे आवडते; जाणून घ्या

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

तुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे?

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर