आता चोरी होणार नाही तुमच्या ‘आधारकार्ड’वरील ‘डाटा’ ; UIDAI ने दिला ‘सुरक्षित’ करण्याचा ‘मंत्र’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सर्वात महत्वाचे कागदपत्र कोणते, तर ते आहे आधार कार्ड. आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी करावा लागतो. सरकारी याेजनेत देखील आधारचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे तुमच्या आधार कार्डची माहिती सुरक्षित ठेवणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राहिला आहे. म्हणूनच तुमचा आधार कार्ड डाटा चोरी होऊ नये यासाठी UIDAI ने लॉक आणि अनलॉकची सुविधा सुरु केली आहे. यामुळे तुमच्या आधार कार्डची माहिती आधिक सुरक्षित राहणार आहे.

अशी असेल लॉक अनलॉक सुविधा
१. असे लॉक करु शकतात तुम्ही आधार कार्ड
२. सर्वात आधी आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा. (www.uidai.gov.in)
३. सर्वात आधी तुमच्या समोर ऑनलाइन सेवेचे ३ पर्याय येतील.
४. त्यातील सर्वात खालील Adhaar Service च्या तिसऱ्या क्रमांकाच्या लॉक/ अनलॉक बायोमेट्रिक पर्यायावर क्लिक करा.
५. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन लिंक ओपन होईल, ज्यात तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.
६. त्यांत माहिती टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक OTP सेंट करण्यात येईल.
७. OTP टाकल्यावर तुम्हाला अकाऊंट लॉगिन करावे लागेल.
८. त्यानंतर डेटा लॉक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सिक्युरिटी कोड टाकून अनेबल वर क्लिक करावे लागेल.
यावर क्लिक केल्यावर तुम्हाला Congratulation! your Biometrics is locked असा मेसेज येईल.

SMS च्या आधारे करु शकतात आधार लॉक
यासाठी तुम्हाला UIDAI च्या नंबर १९४७ वर SMS करावा लागेल. यात तुम्हाल GETOTP असे टाकून स्पेस देऊन तुमच्या आधार कार्ड नंबर वरील शेवटचे ४ नंबर लिहून १९४७ या नंबर वर पाठवा. यानंतर UIDAI तुमचे आधार लॅक करेल आणि तुम्हाला SMS येईल.

अनलॉक करण्यासाठी ही आहे प्रक्रिया
आधारला अनलॉक करण्यासाठी वरील प्रक्रिया पुन्हा तशीच करुन अनेबल आणि डिसेबल हे पर्याय येतील. त्यात तुम्हाला पुन्हा एकदा एक सिक्युरिटी कोड टाकावा लागेल आणि तुमचा डेटा अनलॉक होईल.

SMS च्या आधारे अनलॉक करा आधार
आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी, तुमच्याकडे वर्चुअल आयडी असणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल वरुन GETOTPLAST आणि तुमच्या आधार कार्डचे शेवटेचे ४ अंक टाकून तो मेसेज १९४७ वर पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अनलॉकिंग रिक्वेस्ट पाठवण्यात येईल. त्यानंतर फोन वर पाठवण्यता आलेला मेसेज UNLOCKUIDLAST आणि तुमच्या आधार कार्डचे शेवटेची ४ अंक आणि ६ अंकी ओटीपी १९४७ वर पाठवावा लागेल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड अनलॉक होईल.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या