खुशखबर ! आता दुबईतील सर्व विमानतळावर भारतीय चलन ‘₹’ चालणार, रूपयाने होणार सर्व व्यवहार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे आता दुबईतील सर्व विमानतळांवर तुम्ही भारतीय रुपयांत व्यवहार करू शकता. संयुक्त अरब अमीरातच्या एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार यापुढे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तिन्ही टर्मिनल आणि अल मख्तूम विमानतळावर भारतीय चलन स्वीकारले जाणार आहे. विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानदाराने या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला याबाबत माहिती देताना सांगितले कि, आम्ही भारतीय चलन स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

पर्यटकांना होणार फायदा
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा भारतीय पर्यटकांना होणार असून आता यापुढे भारतात येणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. याआधी त्यांना चलन अदलाबदली करताना मोठ्या प्रमाणात किंमत चुकवावी लागत होती.

मागील वर्षी १ कोटी २२ लाख नागरिकांनी केला प्रवास
‘गल्फ न्यूज’ च्या माहितीनुसार मागील वर्षी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामध्ये १ कोटी २२ लाख भारतीयांचा समावेश होता. याआधी भारतीय नागरिकांना ड्युटी फ्री दुकानांवर वस्तू घेताना डॉलर, दिरहम किंवा यूरोमध्ये पैसे द्यावे लागत होते. या निर्णयानंतर विमानतळावर स्वीकारले जाणारे भारतीय रुपया हे १६ वे विदेशी चलन ठरले आहे.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा