आता ‘PAN’ कार्ड ऐवजी करू शकता ‘AADHAAR’ कार्डचा वापर, सरकारनं बदलला यासंदर्भातील नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. त्याचमुळे 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत नवा नियम बनवण्यात आला. जर तुमच्याकडे PAN नंबर नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. आता जेथे जेथे पॅन कार्डची आवश्यकता भासेल तेथे तेथे तुम्ही आधार कार्डचा नंबर वापरु शकतात.

निर्मला सितारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा –
केंद्र सरकारने इनकम टॅक्स फॉर्ममध्ये काही बदल केले आहेत. सरकारने देखील हे निश्चित केले की नियमात या बदलानंतर कोणत्याही व्यक्तीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. 1 सप्टेंबर 2019 नंतर इनकम टॅक्ससाठी तुम्ही पॅन कार्डच्या जागी आधार कार्डचा वापर करु शकतात. याआधी अर्थसंकल्पात निर्मला सितारामन यांनी घोषणा केली होती की पॅनकार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करता येईल.

आधार कार्डद्वारे भरता येईल इनकम टॅक्स रिटर्न –
सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे जर कोणाकडे पॅन कार्ड नसेल तर ते त्या जागी आधार कार्डचा वापर करु शकतात. म्हणजेच आता तुम्ही पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डच्या मदतीने इनकम टॅक्स रिटर्न भरु शकतात. जेथे जेथे पॅन कार्ड आवश्यक आहे तेथे तेथे पर्याय म्हणून आधार कार्डचा वापर करतात येईल.

मोठ्या व्यवहारासाठी आधारचा वापर –
जर एखाद्या वित्त वर्षात एखाद्या व्यक्तीची कमाई आयकरच्या दरात येत नसेल तर आयकर भरणे अनिवार्य नाही. नवे नियम लागू झाल्यानंतर आता पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करता येईल. इनकम टॅक्स रिटर्नशिवाय पॅनचा वापर मोठ्या व्यवहारावेळी करण्यात येत होता.

फॉर्म्स मध्ये झाले बदल –
इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 अंतर्गत येणाऱ्या नियमात बदल करुन फॉर्म नंबर 3AC, 3AD, 10CCB, 10CCBA, 10CCBB, 10CCBBA, 10CCBC इत्यादीमध्ये बदल करण्यात आले आहेत, या फॉर्ममध्ये जेथे पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर लिहिता येईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like