फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲपचे नवीन फिचर

तुमचा मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला ते कळणार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईट म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता व्हॉट्सॲपने नवीन फिचर आणले आहे. यात युजर्सना व्हॉट्सॲपवर मेसेज किती वेळा फॉरवर्ड झालाय हे कळणार असून, वारंवार एकसारख्याच आशयाच्या मेसेजेसवर निर्बंध येणार आहेत.

व्हॉट्सॲपने फॉरवर्डींग इन्फो आणि फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड या सुविधांच्या माध्यमातून फेक न्यूजला आळा घालण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. फॉरवर्ड मेसेजचा टॅग हे फिचर अलीकडेच दाखल केले असून, त्यानुसार एखादा मेसेज नेमका किती जणांना फॉरवर्ड करण्यात आला याची माहिती मेसेज करणार्‍यास मिळणार आहे. तुमच्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले की, ही सुविधा तुमच्याही हाती दाखल होईल. WABetaInfo ने या निर्णयाची घोषणा केली असून ‘फॉरवर्डिंग इन्फो’ हे ऑप्शन मेसेज इन्फो सेक्शन मध्ये उपलब्ध होणार असून याद्वारे मेसेज किती लोकांना फॉरवर्ड झाल्याचे दिसणार आहे.

यासाठी संबंधित मेसेज स्वत: फॉरवर्ड करणे आवश्यक आहे. चार पेक्षा जास्त युजर्सना मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याला ‘Frequently Forwarded’ टॅग असणार आहे. परंतु, या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध राहणार नाही. बोगस बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या वर्षी ‘फॉरवर्डेड’ हा टॅग आणला. त्याचबरोबर एखादी बातमी एकाच वेळी जास्तीत जास्त पाच जणांना फॉरवर्ड करता येईल, अशीही व्यवस्था केली. त्याचा अनुकूल परिणाम दिसत असतानाच आता एखादी बातमी नेमकी किती जणांना फॉरवर्ड केली याचीही आकडेवारी फॉरवर्डिंग इन्फो या सेक्शनमध्ये मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हे फिचर फारच उपयुक्त ठरणार आहे.