खुशखबर ! आता ‘बनावट’ नोट देऊन तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही, RBI आणत आहे नवी सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा खोट्या नोटा चलनात येत असतात. या खोट्या नोटा म्हणजे खऱ्या नोटेची हुबेहूब नक्कल असते त्यामुळे या खोट्या नोटांमुळे अनेकदा आपलीच फसवणूक होते. मात्र आता खोट्या नोटांमुळे होणारी फसवणूक थांबन्यास मदत होणार आहे . कारण खोट्या नोटा ओळखण्याकरिता लवकरच भारत सरकार एक डिजिटल अ‍ॅप लॉंच करणार आहे.

याबाबत अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार लवकरच मोबइलच्या मदतीने खॊट्या नोटा कशा ओळखता येतील यासाठी अ‍ॅप बनवत आहे. ही जबाबदारी RBI वर सोपवण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार खोट्या नोटा ओळखायच्या कशा ? हे तपासण्यासाठी अ‍ॅप बनवणाऱ्या एजन्सीची निवड करण्यात येत आहे. एकदा का एजन्सी नक्की झाली लवकरच हे अ‍ॅप उपलब्ध होईल. एकदा का अ‍ॅप तयार झालं की कुणीही व्यक्ती नोट खोटी असेल तर ओळखू शकेल.

अंध व्यक्तींकरिता देखील उपयोगी

भारतीय रिझर्व्ह बँक खोटी नोट ओळखणं अंध व्यक्तींनाही सोपं जाईल असं अ‍ॅप बनवतंय. हे अ‍ॅप अंध व्यक्तींना नोट कुठली आहे हे सांगेल आणि ती खरी की खोटी हेही सांगेल. शिवाय ही नोट भारतीय आहे की नाही हेही कळेल. हे अ‍ॅप चालू असताना नोट कॅमेऱ्याच्या समोर ठेवली की तिची किंमत सांगेल. शिवाय यात अशी सिस्टिम असेल की अंध आणि कर्णबधीर असलेल्यांना ही नोट कुठली आहे ते कळेल.