कामाची गोष्ट ! बँकांनी बदलले कर्ज देण्याचे नियम, आता पगार नव्हे तर ‘हे’ पाहून देणार लोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही घर खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण काही सरकारी बँका कर्ज देण्याच्या पद्धतीत बदल करणार आहेत. आता बँक कर्ज देताना तुमच्या पगाराऐवजी तुमचा क्रेडिट स्कोर पाहणार आहे. बँक नव्या गृह कर्जासाठी तुमचा क्रेडिट स्कोर पाहिलं. जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला गृह कर्ज कमी व्याज दरासह मिळेल. परंतू तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुमचे गृह कर्जाचे व्याज दर जास्त राहतील.

या तीन बँकांनी केली सुरुवात
बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँकने आपल्या ग्राहकांना क्रेडिट स्कोरच्या आधारे कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. या तिन्ही बँकांनी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडियाकडून मिळणाऱ्या क्रेडिट स्कोर स्लॅब आधारे कर्ज देण्यास सुरुवात देखील केली.

कर्ज 1 टक्क्यांनी मिळणार स्वस्त
नव्या एक्सटर्नल बेंचमार्किंग व्यवस्थेअंतर्गत आता बँक ऑफ बडोदा नवे कर्ज देताना सिबिल स्कोर(CIBIL Score) ची मदत घेईल. जर एखाद्या ग्राहकाचा एकूण क्रेडिट स्कोर 900 पैकी 760 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 8.1 टक्के व्याज दराने कर्ज मिळेल. जर 725 ते 759 च्या दरम्यान असेल तर व्याज दर 8.35 असेल. 675 ते 724 च्या दरम्यान क्रेडिट स्कोर असेल तर व्याज 9.1 असेल. अशा प्रकारे किमान आणि कमाल व्याज दरात 1 टक्क्यांचे अंतर असेल. जर ग्राहकांचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर 1 टक्के कमी व्याजाने कर्ज मिळेल.

आरबीआयने सर्व बँकांना यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्जासाठी आता क्रेडिट स्कोर उत्तम असणे आवश्यक आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकेने कर्जावर एक्सटर्नल बेंचमार्क स्विकारला आहे. कर्जाच्या पूर्ण कालावधीत क्रेडिट स्कोर उत्तम राखणे देखील तेवढेच महत्वाचे आहे जेवढे कर्ज घेताना महत्वाचे असेल.

क्रेडिट स्कोर कमी झाल्यास वाढेल प्रीमियम
जर कर्ज घेण्याऱ्याचा क्रेडिट स्कोर 760 पेक्षा कमी झाला तर व्याज जास्त होईल. जर एखाद्या कर्जदाराचा सिबिल स्कोर 50 अंकाने जास्त कमी झाला तर सिंडिकेट बँकने प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

700 पेक्षा कमी स्कोर असल्यास 0.10 टक्के आधिक व्याज
यूनियन बँक ऑफ इंंडिया 700 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांना 10 बेसिस पाॅइंट्सने अधिक व्याज दर लावेल. सिबिल स्कोर 300 ते 900 पर्यत असतो. ज्यात 900 सर्वोत्तम स्कोर आहे तर 300 सर्वात वाईट क्रेडिट स्कोर समजला जातो.

क्रेडिट स्कोर म्हणजे काय ?
क्रेडिट स्कोरला सिबिल स्कोर देखील म्हणले जाते. ग्राहकांचा सिबिल स्कोर क्रेडिट सूचना रिपोर्टचा 3 अंकी संख्यात्मक सारांश आहे. जो मागील काही काळापासून क्रेडिट व्यवहार आणि परतावा यावर आधारित असतो. याची रेंज 300 ते 900 असते. स्कोर जेवढा अधिक तेवढे लगेच कर्ज मिळेल, अनेक बँका कर्जाला मंजुरी देताना कर्जदाराचा सिबिल स्कोर आणि रिपोर्ट पाहतात.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी