स्पाइसजेट कडून धमाकेदार ऑफर, देत आहेत शॉपिंग आणि मोफत फिरण्याची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कमी दरात विमानसेवा देणाऱ्या स्पाइसजेटने आता प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. स्पाइसने एक नवी ऑफर आणली आहे ज्यात प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील. या ऑफेरमध्ये तुम्ही ज्या पैशाचे तिकीट बुक कराल ते सगळे पैसे स्टाइलकॅश द्वारे तुम्हाला परत मिळणार आहेत.

तिकिटाचे पैसे ऑनलाईन शॉपिंग करिता
स्पाइसजेटची ही ऑफर ३० सप्टेंबर पर्यंत आहे. याकरिता तुम्ही स्टाइलकॅश स्पाइसजेटची ऑनलाइन शाॅपिंग वेबसाइट स्पाइसस्टाइल डाॅट काॅमवरून तुम्ही शाॅपिंग करू शकता. त्यानंतर तिकिटाचे पैसे कंपनी spicestyle.com अकाउंटमध्ये टाकेल. तेच पैसे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करिता वापरू शकता.

काय आहेत नियम आणि अटी
–तुम्ही ज्या किमतीचं तिकीट बुक केलंत, त्यातले ३० टक्के तुम्ही एकदा शाॅपिंगला वापरू शकता.
— शाॅपिंगनंतर शाॅपिंग कार्ट व्हॅल्यूमधून ते कमी होईल.
–या ऑफरसाठी तुम्ही कमीत कमी १९९९ रुपयांचं शाॅपिंग करू शकता.
–तिकिटांच्या किमतीचं कॅशबॅक ५ हजार रुपयांपर्यंत होईल.
–तिकीट बुक करण्यासाठी ३ महिन्यांच्या आत आॅफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
–या ऑफरचा वापर करताना दुसऱ्या कुठल्या कुपन कोडच्या डिस्काउंट आॅफरचा उपयोग करता येणार नाही.
–ही ऑफर ३० सप्टेंबर २०१९पर्यंत आहे.

You might also like