खुशखबर ! रूपे डेबिट कार्डद्वारे शॉपिंग करणं झालं एकदम ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. एनपीसीआयने रुपे डेबिट कार्डाच्या व्यवहारावर व्यापारी सवलत दर (MDR) कमी केला आहे. त्यामुळे आता रुपे डेबिट कार्डद्वारे शॉपिंग करणे स्वस्त होणार आहे. 20 ऑक्टोबरपासून नवीन एमडीआर लागू होणार आहे. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार डेबिट कार्ड व्यवहारांवर देण्यात आलेली ही सूट सर्व प्रकारच्या पॉईंट ऑफ सेल (POS) वर लागू होईल. याशिवाय नवीन दर ईकॉम आणि भारतक्यूआर कोड आधारित व्यापारी व्यवहारांवरही लागू होतील.

प्रति व्यवहारासाठी जास्तीत जास्त 150 रुपये आकारले जातील –

एमडीआरमध्ये पॉईंट ऑफ सेल (POS), ईकॉम आणि भारत क्यूआर कोड आधारित व्यापारी व्यवहारांमध्ये बदल करण्यात आला आहे. 2,000 रुपयांवरील व्यवहारांसाठी एमडीआरमध्ये प्रति व्यवहार जास्तीत जास्त 150 रुपये मर्यादेसह 0.60% पर्यंत सुधारित करण्यात आले असून सध्या प्रत्येक व्यवहारासाठी 1,000 रुपयाच्या उच्च मर्यादेसह 2,000 रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठी ते 0.90% आहे. भारत क्यूआर म्हणजेच कार्ड आधारित क्यूआर व्यवहारांवरील एमडीआरही कमी करून 0.50 टक्के करण्यात आले असून जास्तीत जास्त एमडीआर 150 रुपये असेल.

एनपीसीआयच्या मते, एमडीआर दर कमी करून आणि जास्तीत जास्त मर्यादा कमी केल्यामुळे आता व्यवसायांना डेबिट कार्डचा व्यवहार करण्यास प्रोत्साहित केले जाईल. आतापर्यंत उच्च दरामुळे ते व्यवहार करणे टाळत आले आहे.

BHIM UPI व्यवहारात देखील MDR घटवला –

यापूर्वी NPCI ने मोबाइल पेमेंट अ‍ॅप भीम यूपीआय (BHIM UPI) व्यवहारासाठी मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) मध्ये बदल केला होता. मोठ्या व्यवहारासाठी एमडीआरची कमाल मर्यादा 100 रुपये निश्चित केली गेली आहे. त्याच वेळी, 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे यूपीआय व्यवहार, जे क्यूआर कोड ‘स्कॅन आणि पे’ द्वारे केले जातात त्यासाठी व्यापाऱ्यांना यापुढे कोणतेही एमडीआर द्यावे लागणार नाही. जास्तीत जास्त 100 रुपयांच्या व्यवहारासह एमडीआर 0.30% करण्यात आला आहे. सध्या 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी 0.25% आणि 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी 0.65% आहे. नवीन एमडीआर दर 01 ऑक्टोबरपासून लागू होतील.

MDR म्हणजे काय?

क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी एका व्यापाऱ्याद्वारे एमडीआर बँकेला दिले जाते. यूपीआयचा वापर करुन व्यापारी पेमेंट्स करण्यासाठी एनपीसीआय विविध पावले उचले आहे . ज्यामध्ये पीपीपीएम व्यवहारांची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाखांपर्यंत वाढवण्यात येतील.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या