‘या’ स्कीमची मोदी सरकारनं दिली ‘गॅरंटी’, दरमहा फक्त 1000 रूपये द्या अन् मिळवा IT ‘टॅक्स’मधील सुटीसह ‘हे’ 3 मोठे फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प 2019 मध्ये सरकारने नॅशनल पेंशन योजनेअंतर्गत कालावधी पूर्ण करणाऱ्या शुल्कांवर टॅक्स फ्री कंपोनंट 40 % वरून 60 % केला आहे. अशातच निवृत्ती पूर्ण करण्यासाठी नॅशनल पेंशन सिस्टीम हा चांगला पर्याय ठरणार आहे. ही योजना वेतन धारकांसोबतच स्वरोजगार करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय असणार आहे. गुंतवणूकीसाठी सर्वजण एनपीएसला पसंत करतात कारण यामध्ये सूट, उत्पादन रचना आणि गुंतवणूकीची गुणवत्ता ही उत्तम आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना आता तीन प्रकारची सूट मिळत आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने त्याला ट्रिपल EEE असे नाव दिले आहे.

ट्रिपल EEE म्हणजे काय ?
या ट्रिपल E मधील पहिला E म्हणजे गुंतवणूक केल्यावर टॅक्समध्ये सवलत. दुसऱ्या E चा अर्थ म्हणजे जमा झालेल्या पैशांवर सुद्धा टॅक्समध्ये सूट आणि तिसऱ्या E चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील टॅक्स सूट. यामुळे भविष्यातील करापासून वाचण्यासाठी NPS हा एक उत्तम पर्याय आहे.

काय आहे नॅशनल पेंशन सिस्टम
ही योजना एक सोशल सिक्युरिटी स्कीम आहे. ज्यामध्ये खाजगी आणि पब्लिक तसेच असंघटित क्षेत्रातील लोक सुद्धा गुंतवणूक करू शकतात. मात्र लष्करात काम करणारे अधिकारी यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. या योजनेच्या मदतीने पेंशन खात्यात गुंतवणूक करता येते आणि निवृत्तीनंतर यातील काही पैसे काढता येतात. एन पी एस खातेधारकाला बाकीची रक्कम दर महिन्याला पेंशन स्वरूपात मिळणार.

NPS मध्ये कशी कराल गुंतवणूक ?
ज्यांना सेवानिवृत्ती आधीच बचत करायची आहे अशा सर्वांसाठी एनपीएस एक चांगली योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर, दरमहा मासिक खर्चासाठी निश्चित रक्कम वापरली जाऊ शकते. तसेच, पगारदार वर्ग प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट मिळण्याचा पूर्ण फायदा घेऊ शकतो.

NPS चे फायदे
NPS मधील गुंतवणुकीमुळे 1.5 लाखा पर्यंतची सूट आयकरामध्ये मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80CC(1) नुसार स्वयं – योगदानास करातून सूट देण्यात आली आहे. त्याची मर्यादा 20 % पर्यंत आहे. त्याच वेळी, कलम 80 CC (2) अंतर्गत नियोक्ताच्या योगदानावर कर सूट आहे. कलम 80 CC (1B) अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. अशा प्रकारे एनपीएस अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते.

अशा प्रकारे उघड NPS खाते
1. ऑफलाइन – ऑफलाइन एनपीएस खाते खोलण्यासाठी तुम्ही बँकेत किंवा पॉईंट ऑफ प्रेजेंसमध्ये जाऊ शकता. इथे तुम्हाला KYC पेपर सोबत एक फॉर्म दिला जाईल. यामध्ये वर्षाला तुम्ही 1,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकत नाहीत. सुरुवातीची गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PARN) दिला जाईल. यासोबत तुम्हाला एक वेलकम किट मिळेल ज्यात तुमचा पासवर्ड असेल. यासाठी तुम्हाला 125 रुपये शुल्क देखील द्यावा लागले, जो एकदाच घेतला जाईल.

2. ऑनलाइन – तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवळ अर्ध्या तासात खाते उघडू शकता. यासाठी अधिकृत वेब साईट वर जावे लागेल. जर बँकेत तुमचे आधार आणि फोन नंबर लिंक आहे तर ही प्रोसेस अजून सोप्पी होईल. नंतर तुम्ही ओटीपीच्या सहाय्याने निवृत्ती खाते सुरु करू शकता. त्यानंतर एनपीसेस खात्यावर लॉगिन करून गुंतवणूक करू शकता.

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like