NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS | तुम्ही तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ची कोणतीही योजना घेतली असेल किंवा घेणार असाल तर आता तुम्हाला फायदा होणार आहे. कारण, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) आता NPS मध्ये हमी पेन्शन कार्यक्रम सुरू करणार आहे. ही योजना 30 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. याचा फायदा देशातील करोडो लोकांना होईल आणि राष्ट्रीय पेन्शनसाठी अर्ज करणार्‍यांची संख्याही वाढेल (National Pension System).

 

नवी पेन्शन योजना 30 सप्टेंबरपासून

पीएफआरडीए अध्यक्ष सुप्रतीम बंडोपाध्याय यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, आता नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये किमान विमा परतावा योजनेवर काम सुरू आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना कोणत्याही परिस्थितीत आकर्षक रक्कम मिळाली पाहिजे. 30 सप्टेंबरपासून ते सुरू होण्याची शक्यता आहे. (NPS)

 

गुंतवणूकदारांना सुरक्षित रिटर्न देण्याचा प्रयत्न

बंडोपाध्याय म्हणाले, गेल्या 13 वर्षांत नॅशनल पेन्शन सिस्टम मजबूत करण्यासाठी बरेच काम केले गेले आहे.
या दरम्यान, आम्ही वार्षिक 10.27 टक्के दराने चक्रवाढ व्याज दिले आहे.
आम्ही गुंतवणूकदारांना नेहमीच महागाई-संरक्षित रिटर्न दिला आहे.

रुपयाची घसरण आणि वाढती महागाई यावर पीएफआरडीएचे अध्यक्ष म्हणाले की, प्राधिकरणाला या सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव आहे.
आम्ही NPS ची रचना अशा प्रकारे केली आहे की गुंतवणूकदारांना कोणत्याही स्थितीत सुरक्षित रिटर्न मिळू शकेल.

 

35 लाख कोटींचा विद्यमान पेन्शन फंड

ते म्हणाले की, जर आपण देशात सध्याच्या पेन्शन फंडाबद्दल बोललो तर तो 35 लाख कोटी रुपये आहे.
यापैकी 22 टक्के म्हणजे एकूण 7.72 लाख कोटी रुपये एनपीएसकडे आहेत. त्याच वेळी, EPFO 40 टक्के शेअर व्यवस्थापित करते.

 

Web Title : – NPS | national pension system nps new initiative by pfrda

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा