NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?

नवी दिल्ली : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS New Rules) चा डाटा जारी केला आहे. यात म्हटले आहे की, एनपीएस (NPS New Rules) योजनेत सबस्क्रायबर्सची संख्या वाढून 4.35 कोटीपर्यंत पोहचली आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत दोन्ही योजनेतील सबस्क्रायबर्सची संख्या 3.59 कोटी होती.

तुम्ही सुद्धा नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System -NPS) मध्ये सहभागी होत या स्कीमचा फायदा घेऊ शकता. लवकरच स्कीममध्ये ग्राहकांना पूर्ण फंड काढण्याची मंजूरी मिळेल.

नुकतेच वृत्त आले आहे की, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (Pension Fund Regulatory and Development Authority – PFRDA) पेन्शनधारकांसाठी एक नवीन पर्याय देण्याची योजना बनवली आहे. या योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम एकाचवेळी पूर्णपणे काढण्यास मंजूरी दिली जाऊ शकते.

5 लाख रुपयांपर्यंत काढू शकतात रक्कम

देशात कोरोना व्हायरस दुसर्‍या लाटेदरम्यान 5 लाख रुपये रक्कम काढल्याने काही ग्राहकांना दिलासा मिळेल.
सध्याच्या नियमांतर्गत एनपीएस होल्डर्स 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. तर पेन्शनर्स आपल्या
काँट्रीब्युशनच्या 60 टक्के रक्कम काढू शकतात.

हे देखील वाचा

Unheard War Crime | गरोदर महिलांच्या शरीरात टाकले जात होते जीवघेणे Virus, जपानी लष्कराचे भयावह सत्य

Mumbai Rains | मुंबईकरांसाठी काळरात्र ! पावसामुळे 25 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तर मोदी सरकारकडून 2 लाखाची मदत जाहीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  NPS New Rules | nps new rules now subscribers withdrawal 5 lakh rupees check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update