NPS | राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सबस्क्रायबर्ससाठी मोठी बातमी ! आता एन्युटी सरेंडरच्या बाबतीत PFRDA च्याशिवाय निकाली काढतील विमा कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम सबस्क्रायबर्स (NPS Subscribers) साठी नवीन सुविधेची घोषणा केली आहे. या अंतर्गत एनपीएस सबस्क्रायबरला 100 टक्के रक्कम काढण्यासाठी एन्युटी सरेंडर (Annuity Surrender) करणे आता पहिल्यापेक्षा जास्त सोपे होईल. इतकेच नव्हे, तर आता सरेंडरची पूर्ण प्रकिया पहिल्याच्या तुलनेत खुप कमी वेळात पूर्ण होईल.

पीएफआरडीएने म्हटले आहे की, आता एलआयसी (LIC), एचडीएफसी लाईफ (HDFC Life), आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाईफ (ICICI Prudential Life) आणि एसबीआय लाईफ (SBI Life) सारखी एन्युटी सर्व्हिस प्रोव्हायर्डच (ASPs) एन्युटी सरेंडर रिक्वेस्ट निकाली काढू शकते.

 

नियामकाच्या हस्तक्षेपशिवाय सरेंडर करू शकतील

पीएफआरडीएने म्हटले आहे की, एन्युटी सरेंडर रिक्वेस्ट निकाली काढण्यासाठी आता सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी (CRKA) किंवा नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS Trust) चा कोणताही हस्तक्षेप होणार नाही. एन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडर्स स्पेसिफिक एन्युटी स्कीम फीचर्स, कंट्रॅक्चुअल टर्म्स, सरेंडर क्लॉज आणि विमा नियामक तसेच विकास प्राधिकरण (IRDAI) निर्देशांच्या आधारावर पीएफआरडीएच्या अंतर्गत सूचीबद्ध सरेंडर रिक्वेस्ट निकाली काढतील.

एनपीएसनुसार, सबस्क्रायबर्स पीएफआरडीएच्या नियमांतर्गत कधीही एग्झिट करू शकतात,
म्हणजे संपूर्ण रक्कम काढू शकतात.
सध्या नियमांतर्गत एनपीएस सबस्क्रायबर्सला पेन्शन फंडच्या 40 टक्के रक्कमेतून एन्युटी प्लान खरेदी करणे अनिवार्य आहे.

Web Title :- nps subscribers now insurers can handle annuity surrender requests pfrda pension scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | कचरा संकलनासाठी नागपूर मनपाने नेमलेल्या कंपन्यांचे कर्मचारी, अधिकार्‍यांची ‘अरेरावी’; पुणे मनपातील सत्ताधारी ‘खाजगी कंपन्या’ नेमणार !

Konkan Flood | पुरग्रस्तांना तुर्तास तातडीची 10 हजारांची मदत, पंचनाम्यानंतर मोठं ‘पॅकेज’

School Fees | शाळांच्या ‘फी’ मध्ये 15 टक्क्यांच्या कपातीस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी

Pune Crime | खळबळजनक ! हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडेंच्या खून प्रकरणी 19 वर्षीय तरूणीस अटक, गुन्हयातील ‘रोल’ निष्पन्न