नागरिकता नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना NRCचे दोन अधिकारी ACBच्या जाळ्यात

गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा लवकरच आणण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांची नोंदणी करून घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पकडण्यात आलेले अधिकारी लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावाची नोंदणी रजिस्टरमध्ये करत होते. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून या दोन अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सैय्यद शाहजाहा आणि राहुल पराशर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई गुवाहाटीच्या दिसपूर एनआरसी केंद्र क्रमाक आठच्या कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी कजरी घोष दत्त (रा. आनंत नगर) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

आसाममध्ये घुसखोरी आणि स्थानिक यांची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारकडून राष्टीय नागरिक नोंदणी कायदा आणण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांच्या नावाची नोंदणी करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेला सैयद शहजाहा हा फिल्ड लेव्हल ऑफिसर आहे. तर पराशर हा लोकल रजिस्टर या पदावर काम करत आहे. हे दोघे लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावाची नोंदणी रजिस्टरला करत असल्याची तक्रार कजरी घोष दत्त यांनी केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सिनेजगत

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…

…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय

‘ब्रह्मास्त्र’साठी बनारसला गेलेल्या रणबीर कपूरचं नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य

 

 

Loading...
You might also like