CAA चं समर्थन करणार्‍या मुख्यमंत्री नितीश कुमारांचं NRC वरून मोठं वक्तव्य, म्हणाले…

पटना : वृत्तसंस्था – नागरिकत्व कायदा व एनआरसीवरून देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. आत्तापर्यंत या आंदोलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कायद्याला व एनआरसीला मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, आसाम, ओडीशा, दिल्ली या राज्यांचा विरोध असून यात आता आणखी एका राज्याची भर पडली आहे.

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या जदयूने बिहारमध्ये मात्र एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी हे स्पष्ट केले आहे, याआधी जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी देखील बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे सांगितले होते. जदयूमध्ये एनआरसीवरून मतभेत झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी राजीनामा सादर केला होता. मात्र नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावत बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे आज (शुक्रवार) सांगितले.

बिहार सहीत संपूर्ण देशात एनआरसी लागू करणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी म्हटले आहे की, एनआरसीच बिहारमध्ये लागू होणार नाही. देशात एनआरसी कायद्यावरून आंदोलन सुरु असताना नितीश कुमार यांनी केलेल्या या घोषणेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/