NSA डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री ‘वांग यी’ यांच्यात व्हिडीओ कॉलवर झाली चर्चा, त्यानंतर गलवान खोऱ्यातून पाठीमागे हटले ‘ड्रॅगन’चे सैनिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. या दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी रविवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी या संदर्भात व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. असा विश्वास आहे कि, हा त्यांच्याच संभाषणाचा परिणाम आहे कि, सोमवारी लडाख गलवान खोऱ्यात चिनी सैनिक मागे परतले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, एनएसए अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामधील संभाषण शांततेचे आणि दूरदृष्टीवर आधारित होते. दोघांमध्ये संपूर्ण शांततेसाठी आणि भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी एकत्र मिळून काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याच वेळी, चिनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये प्रवक्त्याने सांगितले की, 30 जून रोजी भारत आणि चीन यांच्यात तिसर्‍या कमांडर स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देश सीमाभागातील सैन्य मागे हटविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनचे सैनिक अखेर मागे हटले आहेत. माहितीनुसार दोन्ही देशांचे सैन्य हिंसक चकमकीच्या जागेपासून 1.5 किमी मागे सरकले आहे. हे कदाचित गलवान खोऱ्यापुरतेच मर्यादित आहे. आता यास बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडणार नाहीत. याखेरीज आणखी दोन ठिकाणाहून चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही बाजू तात्पुरती रचना देखील काढून टाकत आहेत. भारताने चिनी सैनिकांच्या माघार घेण्यावरही फिजिकल व्हेरिफिकेशन केलेआहे.