‘या’ गेम चेंजर रणनितीने चीनला मागे हटावे लागले, NSA डोभाल यांच्या नेतृत्वाखाली झाले प्लॅनिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पँगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनार्‍यावरून भारत-चीनचे सैन्य मागे हटले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान अनेकदा दोन्ही देशांचे लष्कर आमने-सामने आले, हिंसक संघर्ष झाले, परंतु अखेर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आणि डिसएंगेजमेंटची प्रक्रिया सुरू झाली. पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावर उंच ठिकाणांवर कब्जा करण्याची भारतीय चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेंजर ठरली. याचे प्लॅनिंग एनएसए अजीत डोभाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

सरकारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, चीनशी सीमावाद सुरू असताना एनएसए अजीत डोभाल यांच्या नेतृत्वात एक हाय लेव्हल बैठक झाली. या बैठकीत संरक्षण स्टाफचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे सहभागी होते. या बैठकीत ऑगस्टच्या मध्यावर पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावर उंच पर्वतांवर कब्ज करण्यासाठी एक गेम चेंजर प्लॅनिंग करण्यात आले.

बैठकीच्या दरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला सह दक्षिण किनार्‍यावरील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याचा सल्ला देण्यात आला. जेणेकरून असे केल्याने चीनला चर्चेच्या टेबलावर आणता येईल. आणि नंतर तेच झाले, पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावरील उंचावरील पर्वतांवर भारतीय जवानांनी कब्जा मिळवला. जो चीनशी सुरू असलेल्या संपूर्ण वादामध्ये गेमचेंजर ठरला. यामुळे चीनवर खुप जास्त दबाव आला, कारण भारताने असे करून चीनच्या तुलनेत कितीतरी जास्त पुढे पाऊल टाकले होते.