आता NSC आणि KVP खाते उघडणे आणि बंद करण्यासाठी जावे लागणार नाही पोस्ट ऑफिसमध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NSC-KVP | भारतीय टपाल विभागाने (India Post) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) खाते ऑनलाइन उघडण्याची आणि बंद करण्याची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता कोणीही व्यक्ती घरबसल्या अर्ज करू शकतो आणि आपले खाते बंद सुद्धा करू शकते. या कामांसाठी ग्राहकांना पोस्ट ऑफिसच्या वारंवार चकराही माराव्या लागणार नाहीत.
इंटरनेट बँकिंग वापरणार्या पोस्ट बँक खातेधारकांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. पोस्ट विभागाद्वारे संचालित डीओपी इंटरनेट बँकिंग (DOP Internet Banking) वापरणारे खातेदार घरी बसून एनएससी आणि केव्हीपी खाते उघडू शकतात.
किसान विकास पत्र (KVP)
किसान विकास पत्र (KVP) ही भारतीय टपाल विभागाची एक लहान बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत जमा केलेली रक्कम खाते उघडण्याच्या तारखेपासून नऊ वर्षे आणि पाच महिन्यांनंतर मॅच्युअर होते. या बचत योजनेंतर्गत खाते उघडणार्या लाभार्थ्यांना 6.9 टक्के चक्रवाढ दराने व्याज मिळणार आहे. (NSC-KVP)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही भारतीय टपाल विभागाच्या लहान बचत योजनांद्वारे उपलब्ध असलेली सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत. एनएससीमध्ये जमा केलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षांनी मॅच्युअर होते. सध्या एनएससीवर 6.8 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
NSC आणि KVP खाते कसे उघडायचे
– सर्वप्रथम DOP इंटरनेट बँकिंग की च्या मदतीने लॉगिन करा
– नंतर General Services च्या Service Requests पर्यायावर जा आणि New Requests साठी क्लिक करा
– आता तुमच्या समोर NSC आणि KVP खात्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला जे उघडायचे आहे त्यावर क्लिक करा
– तुम्ही किमान रु. 1000 सह NSC खाते उघडू शकता.
– Debit Account linked PO Saving Account निवडा
– नियम व अटी मान्य करून Click Here पर्यायावर क्लिक करा
– आत्ताच ऑनलाइन अर्ज सबमिट करा
– आता ट्रान्झॅक्शन पासवर्ड भरा आणि सबमिट करा
– शेवटी मिळालेल्या डिटेल्सच्या मदतीने पुन्हा लॉग इन करून तुमच्या NSC खात्याची स्थिती तपासा.
ऑनलाइन असे बंद करा खाते
– सर्वप्रथम DOP इंटरनेट बँकेच्या मदतीने लॉगिन करा
– नंतर General Services च्या Service Requests पर्यायावर जा आणि New Requests साठी क्लिक करा
– NSC खातेधारक closure of NSC Account आणि KVP खातेधारकांनी closure of KVP Account चा पर्याय निवडावा
– NSC किंवा KVP खाते बंद करण्याचा पर्याय निवडा आणि संबंधित खात्यात जमा केलेली रक्कम लिंक केलेल्या Post Office बचत खात्यात जमा करण्याचा पर्याय निवडा.
– शेवटी ट्रान्झॅक्शन पासवर्डच्या मदतीने तुमची विनंती सबमिट करा.
Web Title :- NSC-KVP | kisan vikas patra and nsc can open online close also postal department launch new service
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lipstick Effect | लिपस्टिक आणि अंडरवेयरची विक्री सांगते की इकॉनॉमी बिकट अवस्थेत आहे, जाणून घ्या कसे