पोस्ट ऑफिसची NSC स्कीम – 31 जुलैपूर्वी गुंतवा पैसे, मिळेल जास्त व्याज, टॅक्सची होईल बचत

नवी दिल्ली :वृत्त संस्था – पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम नेहमीच इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला ऑपशन ठरली आहे. जर, तुम्हाला एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळत असेल आणि सोबतच टॅक्स सूट सुद्धा मिळत असेल तर तेथे गुंतवणूक खुप फायदेशिर ठरू शकते. होय, आम्ही आज तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएनसी) बाबत सांगणार आहोत. इन्कम टॅक्स विभागाने कोरोना संकट पाहता टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटची तारीख वाढवून 31 जुलै 2020 केली आहे. विभागाने सेक्शन 80सी, 80डी इत्यादी अंतर्गत टॅक्स सेव्हिंगची तारीख वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 30 जून 2020 होती.

एनएससीबाबत जाणून घ्या…

* काय आहे पोस्ट ऑफिसची एनएनसी स्कीम ?

भारत सरकारकडून जारी ही एक छोटी बचत योजना आहे. ती पोस्ट ऑफिस चालवते. एनएससीशी संबधित एक चांगली बाबत ही आहे की, तुम्ही फक्त 100 रुपये सुद्धा गुंतवू शकता. ज्याप्रकारे नोट 100, 500, 2000 च्या असतात, त्याच प्रमाणे एनएनसी सर्टिफिकेट सुद्धा 100, 500, 1000, 5000 चे मिळतात. यामध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एनएससी खरेदी करू शकता. एनएससीमध्ये सध्या 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.

* एनएनसीमध्ये कोण पैसे गुंतवू शकतो?

कुणीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावेसुद्धा ते खरेदी करू शकता. सर्टिफिकेटचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो. व्याज प्रत्येक वर्षी जमा केले जाते आणि कपांऊंड इंन्टरेस्टच्या ताकदीवर पैसे सतत वाढत जातात. 100 रुपयांची रक्कम 5 वर्षानंतर 144 रुपये होईल. मात्र, टॅक्सवर सूट केवळ 1.5 लाखापर्यंतच मिळते. ही योजना सरकारी आहे, म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित राहू शकतात. सरकारने जेवढे सांगितले आहे तेवढे व्याज मिळेल. याशिवाय जास्त धावपळ करण्याची गरज नसते.

* एनएनसीची मॅच्युरिटी किती वर्षात होते ?

याची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. जर तुम्ही काही अटी पूर्ण केल्या तर 1 वर्षांच्या मॅच्युरिटी नंतर खात्यातील रक्कम काढू शकता. एनएनसीमध्ये व्याज दर पत्येक 3 महिन्यांनी बदलला किंवा निर्धारित केला जातो. यासाठी गुंतवणूकदराने कमी-जास्त होणार्‍या व्याजानुसार गुंतवणूक रक्कमेत सुद्धा बदल केला पाहिजे.

* जर 10 हजार रुपये लावले तर 5 वर्षानंतर किती मिळतील ?

एक्सपर्ट सांगतात की, व्याजदरात घसरणीच्या वेळी सुद्धा एनएनसी एक आकर्षक पर्याय आहे. जर तुम्ही आज 10,000 रुपयांची गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 13890 रूपये मिळतील. सोबतच टॅक्स सूटसुद्धा मिळेल.

* किती टॅक्स सूट मिळेल ?

एनएससीमध्ये प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80 सी प्रमाणे टॅक्स सूट मिळते.

* 18 वर्षापेक्षा कमी वयाचे लोकसुद्धा फायदा घेऊ शकतात का ?

होय, या योजनेचा लाभ 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना सुद्धा मिळू शकतो. म्हणजे अल्पवयीनांना सुद्धा लाभ मिळतो. यासाठी पालकांना 18 पेक्षा कमी वय असणार्‍या मुलांच्या वयांवर एनएनसी खरेदी करावे लागेल. यामध्ये दोन प्रौढ व्यक्ती जॉईंट स्कीममध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतात. तर एनआरआय आणि हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (एचयुएफ)ला या स्कीमचा लाभ मिळत नाही. एनएनसी तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता. नॅशनल सेव्हिंग प्रमाण पत्र एक व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला हस्तांतरित करता येते.