NSC | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ‘स्कीम’द्वारे मिळवा टॅक्स बेनिफिट आणि चांगला व्याजदर, जाणून घ्या पूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NSC | पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना छोटी बचत करणार्‍यांसाठी एक चांगला पर्याय आहे. या अंतर्गत कमी पैशात गुंतवणूक करू शकता, तसेच जमा रक्कमेवर सरकारी सुरक्षा मिळते. याशिवाय प्राप्तीकर कायदा 80सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेवूयात.

कोण उघडू शकते आपले अकाऊंट
या अंतर्गत 18 वर्षावरील कुणीही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो. याशिवाय अल्पवयीनाकडून त्याच्या पालकांना खाते उघडता येऊ शकते.

काय आहे डिपॉझिटची रक्कम
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या मुल्यात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या किमतीचे कितीही सर्टिफिकेट खरेदी करून एनएससीमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये मिनिमम 100 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

टॅक्स बेनिफिट
इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 च्या सेक्शन 80सी अंतर्गत एनएससी अंतर्गत 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणुकीवर टॅक्स कपातीचा लाभ मिळतो.

काय आहे व्याजदर
NSC योजनेत सध्या 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. हे वार्षिक हिशेबाने कंपाऊंड केले जाते.
परंतु पेमेंट मॅच्युरिटीच्या वेळीच होते. स्कीमचा कालावधी 5 वर्षाचा आहे.
मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तो आणखी 5 वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

Web Titel :- NSC | nsc get tax benefit and better interest rate on this post office scheme know the complete details of the scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadanvis | OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण’

Diabetes | 7 दिवसात डायबिटीज कमी करू शकते ‘हे’ विशेष फळ, पुण्यातील डॉ. उन्नीकृष्णन आणि ‘श्रीकाकुलम’चे डॉ. राव यांचे संशोधन

Aadhaar verify | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल ‘आधार’, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस