‘UIDAI’ नं सांगितल्यानं बंद झाली ‘Aadhaar’ संबंधित ‘ही’ सेवा, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार संबंधित महत्वाची सेवा UIDAI कडून बंद करण्यात आली. डेटा रिपॉजिटरी NSDL (National Securities Depository Limited) ने गुरुवारी मध्यरात्रीपासून आधारच्या माध्यमातून ई-साईन करण्याची सुविधा बंद करण्यात आली. NSDL ने हे पाऊल UIDAI कडून घेत निर्देश जारी करण्यात आले. NSDL द्वारे यासंबंधित सूचना जारी करण्यात आली.

NSDL कडून सांगण्यात आले की इंडस्ट्रियालिस्ट्स, इन्वेस्टर्स आणि स्टार्टअप्स, बिजनेसमॅन यांच्या सहाय्यतेसाठी ई-साइन सुरु करण्यात आली होती. यानंतर या व्यक्तींना कोणत्याही दस्तावेजासाठी आणि रेकॉर्डसाठी कोठेही उपस्थित राहण्याची गरज नाही. संस्थापक आणि को-फाऊंडर्स त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणत्याही बाबीला सहमती देण्यात येऊ शकतो. बँकमध्ये देखील ते कामी येते.

सामान्यावर काय होणार परिणाम
ई-साईन ही एक प्रकारची ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्विस आहे. ज्यामुळे आधार होल्डर दस्तावेजांना डिजिटल माध्यमातून साइन करता येते. या प्रकारचे ई सिग्नेचर सर्व्हिस डिजिटल ट्रॉन्जेक्शन आणि व्हेरिफिकेशनला वाढ देण्यासाठी करण्यात आले होते. मागील काही दिवसात NSDL ला डेटा इंटीग्रेट करण्यापासून व्हेरिफिकेशन पर्यंत समस्या येत होती.

टोकनायजेशन सिस्टममध्ये समस्या
आधारच्या टोकनायजेशनमध्ये ई-साईनची प्रक्रिया अडथळा होत होता. याची भीती होती की 12 अंकी अवैध पद्धतीने वापर होईल. तेव्हा 16 अंकी आधार ट्रान्जॅक्शन सिस्टम आण्याचा विचार केला जात होता. परंतू या घोषणेनंतर 1 वर्ष यावर कोणतेही काम करण्यात आले नाही. या प्रकारच्या ई-साईन ऑथेन्टिकेशनचे काम करण्यासाठी बनवण्यात आले होते. यात 12 अंकी आधार नंबर आणि 16 अंकी टोकन सहभागी करण्यात आले होते, ज्याला ओटीपीच्या माध्यमातून पाठवण्यात येत होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like