अलर्ट ! UIDAI चा हा सल्ला ऐका, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांसाठी एक इशारा जारी केला आहे. युआयडीएआयने म्हटले आहे की, पैसे घेऊन तुम्हाला आधार सेंटर ऑपरेटर बनवतो म्हणून सांगणार्‍यांना फसू नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. युआयडीएआयने म्हटले, आधार ऑपरेटर्सना युआयडीएआय नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात. यासाठी आधार सेंटर ऑपरेटर बनवणार्‍यांपासून सावध राहीले पाहिजे.

या नंबरवर करा तक्रार
युआयडीएआयने ट्विट केले, आधार ऑपरेटर्सला युआयडीएआय नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात. आधार सेंटर ऑपरेटर बनण्यासाठी व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील रजिस्ट्रारशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. यासाठी जर कुणी हा दावा करत असेल की तो पैसे घेऊन तुम्हाला आधार सेंटर ऑपरेटर बनवेल तर त्याला फसू नका. सोबतच त्याची तक्रार 1947 नंबरवर कॉल करून नोंदवा.

ऑपरेटर घेतात जास्त चार्ज
एका यूजरला रिप्लायमध्ये युआयडीएआयने हे सुद्धा म्हटले आहे की, जर कुणी आधार इनरॉलमेंट एजन्सी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या आधार अपडेशनसाठी ठरलेल्या चार्जेसपेक्षा जास्त रक्कम मागत असेल तर तुम्ही त्या एजन्सी /ऑपरेटरच्या विरोधात तक्रार करू शकता. नागरिक https://resident.uidai.gov.in/file-complaint वर जाऊन तक्रार ऑनलाइन फाइल करू शकतात. युआयडीएआयने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे की, आधारशी संबंधित कोणत्या सर्व्हिससाठी किती चार्ज आहे आणि कोणत्या सेवा निशुलक आहेत.

You might also like