NSG आता CRPF मध्ये होणार विलिन ? DG म्हणाले – ‘मला याबाबत माहित नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या विलिनीकरणाच्या कथित प्रस्तावावर एनएसजीचे महासंचालक अनूप सिंह यांनी म्हटले आहे की, त्यांना अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नाही. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार एनएसजी आणि सीआरपीएफच कथित विलिनीकरणाच्या प्रस्ताववर सिंह म्हणाले की, अशा कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. एनएसजी आपल्या राष्ट्राची एलीट एजन्सी आहे. ही आपली अशी शक्ती आहे, जी कोणत्या वेळी कुठेही पोहचू शकते आणि जगातील सर्वश्रेष्ठ लष्करापैकी एक आहे. तिची स्वताची एक संरचना आहे आणि मला आशा आहे की, ती अशीच राहिल.

मागील महिन्यात एका वृत्तसंस्थेने जारी केलेल्या रिपोर्ट म्हटले होते की, सरकार विविध अर्धसैनिक दलांना अधिक गतीमान करण्यासाठी सुसंगत लढाऊ युनिट्समध्ये रूपांतरीत करण्यावर विचार करत आहे. यासाठी या दलांचे विलिनीकरण करणे आणि विशिष्ठ वयोमर्यादेनंतर जवानांना अवघड कार्यावर न पाठविण्यासारखी पावले उचलण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत देशाचे सर्वात मोठे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या दहशतवाद विरोधी कमांडो एनएसजी सोबत विलिन करण्यावर चर्चा झाली होती.

अधिकार्‍यांनी सांगितले की, ही दोन्ही दले एकमेकांपेक्षा खुप वेगळी आहेत. परंतु, दोन्ही दलांच्या एक कमांडबाबत चर्चा सुरू आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) कायदा व्यवस्था कायम ठेवणारे, नक्षलविरोधी आणि उग्रवादविरोधी प्रमुख दल आहे. तर एनएसजी दहशतवादविरोधी आणि हायजॅक विरोधी मोहिमेसाठी प्रमुख दल आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, यांचे विलिनीकरण सध्या केवळ चर्चेच्या स्तरावर आहे आणि ते स्वीकारणे किंवा नाकारण्यापूर्वी अनेक मुद्द्यांवर अभ्यास केला जाईल.

आयटीबीपी – एसएसबीचे विलिनीकरण !
या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, अधिकार्‍यांनी सांगितले की, चीन आणि नेपाळसारख्या देशांना लागून असलेल्या पूर्व भागातील सीमेचे रक्षण करणारी दोन दले भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी) यांचे विलिनीकरण करून एक लढाऊ युनिट तयार केले जाऊ शकते. सध्या दोन्ही दलांचे कार्य वेगवेगळे आहे. आयटीबीपी चीन लगतच्या 3,488 किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (एलएसी) चे रक्षण करते. तर एसएसबी नेपाळ लगतची 1,751 किमी लांबीची सीमा आणि भूतान लगतच्या 699 किमी सीमा रेषेचे रक्षण करते.

एका अधिकार्‍याने सांगितले की, या विषयावर काही चर्चा झाली आहे. परंतु दोन्ही दलांचे विलिनीकरण करण्यापूर्वी फायदा – तोट्याचा विचार करावा लागेल. कारण असा कोणताही निर्णय कारगिल युद्धानंतर घेतल्या गेलेल्या त्या नितीगत निर्णयांच्या विरूद्ध असू शकतो, ज्याअंतर्गत एका सीमेसाठी एका दलाचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही दलात एक लाखापेक्षा कमी कर्मचारी आहेत. या विषयावर अधिक चर्चा होत आहे आणि कोणत्याही गोष्टीला अंतिम रूप देण्यात आलेले नाही.