NSUI कडून शहिदांना अभिवादन

पुणे : प्रतिनिधी –   चिनी घुसखोरांनी आक्रमण करून भारतभूमीची काही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केंद्र सरकारने चिनी घुसखोरांवर कठोर पावले उचलावीत. राजकारण न करता देशवासीय त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे एनयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन यांनी सांगितले.

कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोर पुणे शहर आणि जिल्हा एनएसयूआयतर्फे शुक्रवारी (दुपारी 2.30 वा) राजीव गांधी स्मारकाजवळ शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले, असे एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन यांनी स्पष्ट केले.

जैन म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने आज (शुक्रवार, दि. 26 जून) राज्यभर शहिदों को सलाम दिवस पाळला गेला. हा उपक्रम एनएसयूआयच्या वतीने देखील कात्रज येथील राजीव गांधी स्मारकासमोर केला गेला. शहिदांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी शपथही यावेळी घेण्यात आली. चीनने भारताची भूमी हडप केली, त्याचा निषेध करण्यात आला. भारत सरकारने भारतभूमी परत मिळवावी, यासाठी निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी एनएसयूआयचे पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, केतन जाधव, कौस्तुभ लोखंडे, संजय अभंग, शुभम पाटील, राज जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.