दिल्ली येथे शहिद झालेल्या शेतकऱ्यांना NSUI ने दिली 2 दोन तास अभ्यास करून श्रद्धांजली !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्हा NSUI व महाराष्ट्र् प्रदेश NSUI च्या वतीने कॉलेज सुरू झाल्या पहिल्याच दिवशी आज मॉडर्न कॉलेजच्या समोर दिल्ली येथील आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना दोन तास अभ्यास करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..

martyred-farmers

केंद्र सरकार ने आणू घातलेल्या तीन काळ्या शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असून प्रचंड थंडीत हे आंदोलन गेल्या दोन तीन महिन्या पासून हे आंदोलन सुरू आहे ,अश्या परिस्थिती केंद्र सरकार शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारे ढोकून देखील पाहत नाहीय या उलट शेतकऱ्यांना बदनाम करून त्यांच्यावर बळाचा वापर करत आहे या आंदोलनामध्ये मध्ये अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत या घटनेचा विरोध म्हणून व मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून पुणे NSUI व महाराष्ट्र् NSUI च्या वतीने अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन दोन तास आभ्यास करत श्रध्दांजली वाहिली आहे या प्रसंगी महाराष्ट्र् NSUI चे अध्यक्ष अमीर शेख पुणे जिल्हा NSUI अध्यक्ष भूषण रानभरे, अविनाश सोळंके, सुरज पंडित,उमेश खंदारे, अभिजीत हळदेकर, संकेत गलांडे, डॉ. अभिजीत बाबर, रवी पांडे, सुरज जगताप, निखिल पवार, राहुल सोनवणे, निकिता बहिरट, आबासाहेब जाधव , आवदुंबर आगलावे, प्रफुल्ल पिसाळ, प्रसन्न मोरे, राज जाधव, सुरज पंडित , ओम दहिफळे, परमेश्वर आंदिल, स्वप्नील कदम , स्वप्नील गोफने, स्वप्नील खोकले, योगीराज रंधवे, सचिन पांडुळे,संग्राम शेवाळे, शुभम पाटील, निखिल भालेकर, शुभम कांबळे, तेजस शिंदे, आदींची उपस्थिती होती..